JN Tata Endowment Loan Scholarship : जे एन टाटा लोन स्कॉलरशिप मार्फत विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये अर्थसहाय्य;असा करा अर्ज

JN Tata Endowment Loan Scholarship : 1892 मध्ये स्थापन झालेल्या टाटा ग्रुप अंतर्गत जे एन टाटा एन्डॉवमेंट अवॉर्ड मेरिट लिस्ट लोन स्कॉलरशिप विद्यार्थासाठी चालू केलेली आहे. संपूर्ण भारतभरातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत 90 ते 100 विद्यार्थी निवडले जातात आणि त्यांना स्कॉलरशिप दिल्या जाते.

मॅनेजमेंट, लॉ आणि कॉमर्स तसेच फायनान्स मधील विद्यार्थ्यांना ही एन्डॉवमेंट लोन कॉलरशिप दिल्या जाते. जमशेदजी टाटा यांनी चालू केलेल्या टाटा ग्रुप अंतर्गत ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.

आवश्यक पात्रता

  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा त्याचे वय 45 वर्षापेक्षा अधिक नसावे (हे वय 30 जून 2025 रोजी ग्राह्य धरल्या जाणार आहे)
  • विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून झालेले असावे व कमीत कमी 60 टक्के गुण त्यांना मिळालेले असणे गरजेचे आहे.
  • पदवीधारणा केलेल्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल केला असेल व त्याची निवड झालेली नसेल असे विद्यार्थी अर्ज करू शकतील.
  • जे विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेत असतील व भारताच्या बाहेर जरी शिक्षण घेत असते तर त्यांना ही शिष्यवृत्ती दिल्या जाईल.
  • दरवर्षी ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे जुलै महिन्याच्या आसपास हि स्कॉलरशिप दिल्या जाते. जे विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला असतील असे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात.
  • याविषयीची सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता किंवा टाटा ग्रुपच्या या ईमेल आयडीवर तुम्ही सर्व डिटेल्स टाकून शिष्यवृत्तीची माहिती मिळवू शकता.
  • ज्या विद्यार्थ्यांनी टाटा ग्रुप मधून लोन स्कॉलरशिप घेतलेली असेल आणि पूर्णतः परतफेड केली असेल तर असे विद्यार्थी सुद्धा परत अर्ज करू शकतील.
  • जे विद्यार्थी भारताच्या बाहेर अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डिग्री, डिप्लोमा चे शिक्षण घेत असतील परंतु ते शिक्षण ऑनलाईन असेल किंवा डिस्टन्स लर्निंग मध्ये असेल तर ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाहीत.
  • विद्यार्थी जर एका वर्षाचा डिप्लोमा करत असतील तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा हे शिष्यवृत्ती मिळणार नाही.

या शिष्यवृत्तीचे फायदे (JN Tata Endowment Loan Scholarship)

या स्कॉलरशिप मध्ये दहा लाखापर्यंत लोन स्कॉलरशिप दिली जाते.

आवश्यक कागदपत्रे

या शिष्यवृत्ती मध्ये अर्ज सादर केल्यानंतर निवड करायची की नाही करायची हे सर्व जबाबदारी व्यवस्थापनाची राहणार आहे व्यवस्थापन ज्या पद्धतीने निवड करेल ती निवड ग्राह्य धरणे उमेदवाराला बंधनकारक राहील.

उमेदवाराला अर्ज करते वेळेस खालील पण सर्व कागदपत्रे जमा करणे बंधनकारक राहील यामध्ये

  1. अर्जदाराचा फोटो
  2. आधार कार्ड
  3. पासपोर्ट पहिल्या पानाचा आणि शेवटच्या पानाचा फोटो
  4. मार्कशीट/शाळा सोडल्याचा दाखला
  5. स्टेटमेंट ऑफ प्रपोज
  6. अनुभवाचे प्रमाणपत्र मागील कंपनीकडून
  7. नवीन कंपनीचे अपॉइंटमेंट लेटर
  8. नवीन भरलेला आयटीआर किंवा तीन महिन्याचे पगार पत्रक
  9. ऍडमिशन घेतल्याचा पुरावा
  10. शेवटच्या वर्षाचे मार्कशीट किंवा पदवीचे प्रमाणपत्र/स्कोर कार्ड
  11. सर्टिफिकेट एक्सट्रॅक्टीव्हिटी केल्याचे पत्र
  12. प्रोजेक्ट वर्क
  13. रिझ्युम
  14. कॉस्ट ऑफ एज्युकेशन
  15. सोर्स ऑफ फंड्स

फायनल सिलेक्शन दरम्यान

  1. अर्जदाराचे पॅन कार्ड
  2. एक कॅन्सल चेक
  3. बँकेचे स्टेटमेंट
  4. आधार कार्ड

सर्व कागदपत्रे पीडीएफ करून अपलोड करावेत.

अर्ज कसा करावा

यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम https://jntataendowment.org/ या लिंक वर जावे लागेल या लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल. जर नोंदणी केली नसेल तर ईमेल आयडी मोबाईल नंबर किंवा जीमेलने तुम्ही लॉगिन करू शकता.

लॉगिन करून तुम्हाला अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक करायचे आहे त्यानंतर सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.अर्ज करण्यासाठी कोण पात्र असेल

Ans : जे विद्यार्थी पूर्णवेळ पोस्ट ग्रॅज्युएट पीएचडी किंवा पोस्ट डॉक्टर स्टडी करत आहेत ते या एडोवनमेन्ट शिष्यवृत्तीसाठी पात्र राहतील.

2.माझं ॲडमिशन कन्फर्म झालेले नाही मी अर्ज करू शकतो का?

Ans : हो, तुम्हाला यासाठी या ईमेल आयडीवर एक मेल पाठवायचा आहे आणि रेफरन्स नंबर द्यायचा आहे जे अर्जाच्या डाव्या बाजूला दिलेला आहे.

3.माझ्या अर्जांमधील माहिती मी शेवटच्या टप्प्याला अपडेट करू शकतो का?

Ans : हो, तुम्ही माहिती शेवटच्या टप्प्यात अपडेट करू शकता यासाठी तुम्हाला jnteapplication@tatatruts.org यावर मेल करायचा आहे आणि तुमच्या एप्लीकेशन चा रेफरन्स नंबर द्यायचा आहे.

4.मला या स्कीम मधून जास्तीत जास्त किती लोन मिळू शकते?

Ans : या शिष्यवृत्ती दरम्यान तुमची निवड झाली तर त्यात तुम्हाला एक लाख ते दहा लाखापर्यंत कर्ज स्कॉलरशिप मिळू शकते.

Leave a Comment