PM Jan Dhan Yojana 2025 : सरकारच्या पीएम जन धन योजनेमध्ये खाते उघडून विविध सुविधांचा लाभ घ्या आणि 5000 रुपये ओवरड्राफ्ट मिळवा
PM Jan Dhan Yojana 2025 : सर्वसामान्य साठी सरकार विविध योजना आणत असते आणि त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिक घेत असतात परंत्तू काही योजनेची माहिती नागरिकांना राहत नाही किंवा संबंधित योजनांची पूर्ण माहिती नसते, अश्यात कोणतीही योजना आणली तरी तिला खूप कमी प्रतिसाद मिळत असतो असतो अशीच एक योजना आहे पीएम जन धन योजना.
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना झिरो बॅलन्स चे अकाउंट ओपन करण्यात येत असते, यासोबतच यामध्ये वेगवेगळे लाभ सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना मिळत असतात परंतु त्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नसते त्यामुळे हे नागरिकता सुविधाचा लाभ घेऊ शकत नाहीत.
तुम्ही पण जण धन योजनेचे खाते जर उघडलेले असेल तर त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे लाभ तुम्हाला मिळत असतात झिरो बॅलन्स व्यतिरिक्त इतर कोणत्या सुविधा तुम्हाला दिल्या जातात याची सुद्धा माहिती या लेखांमध्ये दिलेले आहेत ते सर्व माहिती आपण पाहणार आहोत.
हे अकाउंट तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये जाऊन ओपन करू शकता किंवा बँक मित्र म्हणून कोणी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते ओपन करू शकता गेल्या. आठ ते दहा वर्षापासून प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना भरपूर सुविधा दिल्या गेलेल्या आहेत.
खाते कसे काढाल?
तुम्ही जर दारिद्र्य रेषेखालील उमेदवार असेल किंवा तुमच्याकडे बीपीएल कार्ड असेल तर तुम्ही जनधन योजनेचे खाते कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन काढू शकता. जनधन खात्यामध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम भरायची गरज नाही.
किंवा कोणत्या प्रकारचे बॅलन्स मेंटेन करण्याचे सुद्धा आवश्यकता नाही त्यामुळे कोणीही नागरिक या खात्यासाठी अर्ज करू शकतो तुमच्याकडे फक्त आधार कार्ड असेल तर तुम्ही या खात्यासाठी अर्ज करू शकणार आहात
आवश्यक कागदपत्र
प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते उघडण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे आहेत कागदपत्रे तुम्हाला खाते उघडते वेळेस जमा करणे आवश्यक आहे कागदपत्राची माहिती खाली दिलेली आहे.
एक आधार कार्ड किंवा आधार कार्डचा नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जर नसेल तरी पण तुम्ही खाते उघडू शकता यासाठी तुम्हाला फक्त एक ऍफिडेव्हिट देणं गरजेचं असेल.
तुमच्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसेल तर तुम्ही मतदान कार्ड, ड्रायविंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा नरेगा कार्ड दाखवून हे खातं काढू शकता.
जर वर नमूद केलेले कोणतेच कागदपत्र नागरिकाकडे नसतील तर त्यांना सुद्धा या बँकेमध्ये खाते काढता येऊ शकते हे खातं काढण्यासाठी तुम्हाला बँकेला जाऊन एकदा भेट द्यायची आहे आणि सविस्तर परिस्थिती सांगायची आहे तुमच्याकडे कोणताही पुरावा असेल तरी ते तुमचं खातं उघडून देतील.
जर तुमच्याकडे वर दिलेल्या कोणताच कागदपत्राचा पुरावा नसेल तर तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभागामध्ये कार्यरत असाल तर त्याचे ओळखपत्र तुम्ही दाखवू शकता किंवा एखाद्या राजपत्रित अधिकाऱ्याने आपले फोटोग्राफ असलेले कागदपत्र दाखवून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
भारतातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन तुम्ही हे खाते उघडू शकता व भारत सरकारच्या तसेच महाराष्ट्र सरकारच्या सर्व योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकता, जर तुम्ही या एकांताचा रेगुलर वापर केला तर इतर सुविधेचा लाभ सुद्धा तुम्हाला मिळते, पण एक वर्ष तुम्ही हे खात वापरलं नाही तर तुमचे खाते बंद सुद्धा होऊ शकते.
या खात्यामध्ये तुम्हाला रूपे चे डेबिट कार्ड आणि 10 पानी चेकबुक दिल्या जाते व बँकेचे पासबुक सुद्धा तुम्हाला मिळते त्याचा वापर तुम्ही कोठेही करू शकता.
लाभ कशा प्रकारे मिळतात?
- तुम्ही जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळते.
- 1 लाख रुपयापर्यंतचा दुर्घटना विमा मिळतो.
- कोणतीही राशी तुम्हाला ठेवणे गरजेचे नाही.
- प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत 30 हजार रुपयांचा जीवन विमा लाभार्थी किंवा त्यांच्या मृत्यू स्वच्छता त्यांच्या वारसदाराला देण्यात येईल.
- इतर कोणत्याही योजनेचे पैसे लगेच हस्तांतरित करता येतील.
- सरकारी योजना चे पैसे सुद्धा लगेच हस्तांतरित करता येतील.
- सहा महिने जर तुम्ही खाते व्यवस्थित रित्या चालवले तर यावर तुम्हाला ओव्हरड्राफ्ट ची सुविधा सुद्धा दिली जाते.
- पेन्शन, विमा ,उत्पादन इत्यादीची माहिती सुद्धा तुम्हाला अकाउंट द्वारे देण्यात येते.
- प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत व्यक्तिगत दुर्घटना तसेच दावा रूपे कार्ड धारक कोणत्याही शाखेमध्ये जाऊन करू शकतात किंवा बँक मित्र ए टी एम, पी ओ एस इत्यादी चॅनेलद्वारे सुद्धा कमीत कमी वेळेमध्ये हे दाखल करू शकतात
- काही दिवसानंतर तुम्ही खाते उघडलेले असेल तर तुम्हाला व प्रति कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्ती मागे पाच हजार रुपये एवढी ओव्हर ड्रॅफ़्ट सुविधा या खात्यामार्फत दिल्या जाते.
तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते उघडू इच्छिता असाल तर वर संपूर्ण माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती वाचा आणि या माहित व्यतिरिक्त अधिकृत संकेतस्थळ https://pmjdy.gov.in/hi-scheme या वर जाऊन पूर्ण माहिती घेऊ शकता व या योजनेमध्ये तुमचा सहभाग नोंदवू शकता.