Bhausaheb Phundkar Falbagh Lagvad Yojana

Bhausaheb Phundkar Falbagh Lagvad Yojana: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 100% अनुदान; वाचा सविस्तर माहिती

Bhausaheb Phundkar Falbagh Lagvad Yojana : 2018-19 पासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरू करण्यात आलेली आहे, या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जे लाभार्थी लाभ घेऊ शकत नाहीत ते फळबाग लागवड बाबींचा लाभ घेऊ शकत नाही त्यांना हे लाभ देण्यात येणार आहे.

सदर योजना शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत राबविण्यात येत आहे या योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30%, आणि तिसऱ्या वर्षी 20% अश्या तीन वर्षात देण्यात येणार आहे.

लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% ठेवणे आवश्यक आहे, हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्यांनी स्वखर्चाने झाडे लावून पुन्हा जिवंत झाडाचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक असेल.

या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकरी कोकण विभागात कमीत कमी दहा गुंठे तर जास्तीत जास्त दहा हेक्टर आणि इतर विभागात कमीत कमी 20 गुंठे तर जास्तीत जास्त सहा हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पहिले त्या योजनेच्या अटीप्रमाणे लाभ घेणे आवश्यक आहे त्यानंतर उर्वरित क्षेत्रासाठी वर नमूद केलेले क्षेत्र मर्यादेच्या अधीन राहून लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात,अल्प अत्यल्प भूधारक महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही शेतीच्या इतरपिकांसोबत फळबाग लावून चांगला व्यवसाय सुद्धा करू शकता, सरकारची हि योजना फक्त हंगामी पिके घेणाऱ्या शेतककऱ्यांसाठी संजीवनीच ठरणार आहे, तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करून अर्ज करावा लागेल जर, अर्ज करता येत नसेल तर जवळच्या महा-ई सेवा केंद्राला भेट देऊन अर्ज करू शकता.

अनुदान किती मिळेल

या योजनेमध्ये लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणी करिता शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे, सर्व अनुदान व इतर माहिती पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ (येथे क्लिक करा) आहे ती पीडीएफ तुम्ही वाचू शकता.

आवश्यकता पात्रता

  1. लाभार्थ्याला फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन बसवणं अनिवार्य असेल.
  2. सर्व प्रवर्गांतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे व त्यानंतर इतर शेतकऱ्याचा विचार करण्यात येईल.
  3. कुटुंब म्हणजे पत्ती, पत्नी व अज्ञान मुले यांसाठी लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे.
  4. व्यवसायिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
  5. शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर सातबारा असणं आवश्यक आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदाराच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिस्सा मर्यादित असावा.
  6. सातबारावर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती असणे आवश्यक आहे.
  7. परंपरागत वननिवासी वन अधिकार मान्यता अधिनियम 2006 नुसार वनपट्टी धारक शेतकरी हा लाभ घेण्यास पात्र आहेत.
  8. इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केल्या असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसार शेतामध्ये आलेत शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  1. यासाठी सातबारा व आठ-अ चा उतारा
  2. शेतकऱ्यांचे हमीपत्र
  3. संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदाराचे संमती पत्र
  4. जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांसाठी आवश्यक असेल)

अर्ज कसा करायचा?

ऑनलाइन पद्धतीने सरकारच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही अर्ज करू शकता यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अर्जदार नोंदणी करावी लागेल त्यानंतर अर्जदाराची लॉगिन करून तुम्हाला फळबाग योजना लागवड विषयी माहिती पहावी लागेल.त्यातून तुम्हाला हि योजना निवडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

या योजनेव्यतिरिक्त इतर सुद्धा योजना महाराष्ट्र सरकार मार्फत राबविल्या जातात त्याची सुद्धा माहिती तुम्हाला वरील संकेतस्थळावर मिळेल, तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर PDF मध्ये दिलेली सर्व माहिती व्यस्थित वाचावी व ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

तसेच शासन निर्णय सुद्धा दिलेला आहे त्याचे सुद्धा वाचन करून आवश्यक त्या सर्व बाबी समजून नंतरच ऑनलाईन अर्ज सादर करावा, अर्ज सादर करतेवेळेस आवश्यक ते सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत जेणेकरून तुम्हाला अचूक अर्ज भरता येईल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1. ही योजना कोणाच्या अखत्यारीत्या आहे?

Ans: ही योजना केंद्र शासनाच्या आखत्यारीत्या असल्याने केंद्र शासन व महाराष्ट्र शासन या दोघांच्या अंतर्गत चालवेळी जाते यासाठी केंद्र शासन सुद्धा वेळोवेळी मदत करत असते.

2. या योजना अंतर्गत किती अनुदान मिळते?

Ans: या योजनेअंतर्गत ठिबक सिंचनासाठी 100% अनुदान दिले जाते.

3. सातबारा माझ्या नावावर नसेल तर अर्ज करू शकतो का?

Ans: नाही, सातबारा तुमचा स्वतःच्या नावावर असणे आवश्यक आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *