Mahindra Empower her scholarship : महिंद्रा मार्फत 9वी ते पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना 5,500 रुपयांची शिष्यवृत्ती;त्वरित अर्ज करा
Mahindra Empower her scholarship : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्या ऑटो व फार्म डिव्हिजन अंतर्गत महिंद्रा एम्पावर हर स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 हे नववी ते बारावी तसेच अंडरग्रॅज्युएट बीएससी, बीकॉम यामध्ये प्रवेश घेतलेल्या अशा विद्यार्थिनींना ही स्कॉलरशिप देण्यात येत आहे.
संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी हि शिष्यवृत्ती खुली असल्याने कोणतीही विद्यार्थिनी जे नववी ते बारावी किंवा पदवीचे शिक्षण घेत असेल ते या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतील, महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या कारपोरेट सोशियल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत हा पुढाकार घेतला जातो.
महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या विषयीची माहिती आपल्या सर्वांना आहेत महिंद्रा कंपनीला आपण चांगल्या प्रकारे ओळखतो खेड्यामध्ये महिंद्रा कंपनी ट्रॅक्टर साठी प्रसिद्ध आहे तर मोठ्या शहरांमध्ये थार या गाडीसाठी महिंद्रा तुम्हाला बघायला मिळते.
Table of Contents
आवश्यक पात्रता
- नववी ते बारावी किंवा बीएससी, बीकॉम मध्ये प्रवेश घेतलेली कोणतीही विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहे.
- विद्यार्थिनीला मागच्या वर्षी कमीत कमी 50% गुण मिळालेले असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थिनीच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न चार लाखापेक्षा जास्त नसावे.
- संपूर्ण भारतभरातील विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
- अपंग,अनुसूचित जाती,जमाती व इतर मागासवर्गीय मधील मुलींना या शिष्यवृत्ती मध्ये प्राधान्य देण्यात येईल.
- महिंद्रा अँड महिंद्रा आणि बडी फॉर स्टडी च्या कर्मचाऱ्यांचे पाल्य या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाहीत.
शिष्यवृत्तीचे फायदे
निवड झालेल्या अर्जदार विद्यार्थिनींना एक रकमी पाच हजार पाचशे रुपये एवढी शिष्यवृत्ती एकदाच देण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे
या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला खालील कागदपत्रे स्कॅन करून व्यवस्थित रित्या अपलोड करायचे आहेत. या कागदपत्रांमध्ये खालील कागदपत्राचा समावेश असेल.
- अर्जदाराचा अलीकडच्या काळातला पासपोर्ट साईज फोटो
- सध्या प्रवेश घेतल्याचा पुरावा ज्यामध्ये प्रवेश पत्र किंवा शाळेचे ओळखपत्र असेल.
- मागच्या वर्षीचे गुणपत्रक
- दहावी/बारावीचे मार्कशीट
- पालकांच्या उत्पन्नाचा पुरावा ज्यामध्ये सॅलरी स्लिप किंवा गव्हर्मेंट अधिकाऱ्याकडून मिळालेले पत्र.
- शैक्षणिक खर्चाच्या सर्व पावत्या ज्यामध्ये ट्युशन फीस भरल्याची पावती, होस्टेल फीज किंवा बुक साठी खर्च केलेल्या रकमेचा समावेश असेल.
- ओळखीचा पुरावा ज्यामध्ये (आधार कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स याचा समावेश असेल)
- बँकेचे पासबुक किंवा चेकबुक
- अपंग असल्यास अपंगत्वाचा पुरावा
- एससी/एसटी किंवा ओबीसी मधून अर्ज करत असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा (Mahindra Empower her scholarship)
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तुम्हाला https://www.buddy4study.com/page/mahindra-empowerher-scholarship-program या लिंक वर गेल्यानंतर आपला अकाउंट लॉगिन करायचा आहे.
- अकाउंट लॉगिन केल्यानंतर तुम्हाला महिंद्रा एम्पावर हर स्कॉलरशिप प्रोग्राम 24-25 याचा ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल तिथे अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक करायचं आहे.
- तुम्ही नोंदणी केली नसेल तर अगोदर तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
- सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित रित्या भरायची आहे सांगितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड करायचे आहेत, त्यांच्या नियम व अटी तुम्हाला एक्सेप्ट करून अर्जाचा प्रीविव् बघायचा आहे.
- या प्रीविव् मध्ये तुम्ही भरलेले सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरलेली आहे की नाही हे तपासायचे आहे आणि त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.
महिंद्रा कंपनीमार्फत चांगला पुढाकार विद्यार्थिनीसाठी घेण्यात आला असून दरवर्षी हि शिष्यवृत्ती महिंद्रा तोफे देण्यात येते, यामध्ये विविध खर्चाचा समावेश असतो. तुम्ही शिक्षणासाठी केलेला बहुतेक खर्च या शिष्यवृत्तीमधून तुम्हाला मिळतो, आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा कंपनीमार्फत हा पुढाकार या वर्षी साठी घेण्यात येत आहे.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ 05 फेब्रुवारी 2025 आहे परंतु हि तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, याशिष्यवृत्तीचे काही अपडेट्स आल्यास तुम्हाला याच पेजवर कळविण्यात येईल, अश्याच अनेक शिष्यवृत्या विषयी माहिती आमच्या या संकेत्स्थावर देण्यात येते,कृपया नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनेल ला फॉलो करा आणि अपडेट्स दररोज मिळवा.
तुम्ही सुद्धा या शिष्यवृत्तीसाठी पात्रता धारण करत असल्यास वर लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन नमूद केलेल्या तारखेअगोदर अर्ज सादर करा आणि महिंद्रा मार्फत मिळणाऱ्या या शिष्यवृत्तीचा लाभ घ्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
1.या शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया कशी असेल?
Ans : या शिष्यवृत्ती मध्ये प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी होईल त्यानंतर विद्यार्थ्यांचे बॅकग्राऊंड तपासण्यात येईल, मोबाईल वर त्याची मुलाखत घेऊन कागदपत्राची पडताळणी होईल आणि नंतर निवड केल्या जाईल.
2.निवड झाल्यानंतर मला रक्कम कशा प्रकारे मिळेल?
Ans: ज्या विद्यार्थिनीची निवड या स्कॉलरशिप मध्ये केला जाईल तिच्या बँक खात्यावर ही रक्कम हस्तांतरित करण्यात येईल.
3.या शिष्यवृत्तीसाठी कशा पद्धतीने अर्ज करावा लागेल?
Ans: या शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावा लागेल वर अर्ज सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया देण्यात आलेली आहे.