Rashtriy Falotpan Abhiyan 2025

Rashtriy Falotpan Abhiyan 2025: एकात्मिक फलोत्पादन योजनेमार्फत विविध बाबींसाठी सरकार देते अनुदान;पहा किती? आणि कसे मिळेल?

Rashtriy Falotpan Abhiyan 2025 : 2005-06 पासून फलोत्पन्न क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वकांक्षी अभियानाची सुरुवात केली आहे. अभियानाच्या कालावधीमध्ये देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश राहणार आहे.

यासाठी गुणवत्ता पूर्ण लागवड व साहित्य निर्माण करणे नवीन फळबागांची लागवड करणे, जुन्या फळभागाचे पुनरुज्जीवन करणे, सामूहिक शेततळ्याच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढवणे, हरितगृह शेडनेट हाऊस मध्ये नियंत्रित शेती करणे, एकात्मिक द्रव्य व एकात्मिक जोड व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, मनुष्यबळ विकास, काढणी व्यवस्थापन या बाबीसाठी अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे, ही योजना कृषी विभागामार्फत चालवल्या जात असून या योजनेचे उद्दिष्ट व अनुदानाविषयी ची माहिती खाली पाहू शकता.

अनुदान कशासाठी मिळते

खालील घटकांचा लाभ या योजनेअंतर्गत शेतकरी घेऊ शकतील

  • उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकाची लागवड करणे व त्या संवर्धन प्रयोगशाळाचे बळकटीकरण व पुनरुजीकरण करणे.
  • नवीन उत्तीसंवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे.
  • भाजीपाला विकास कार्यक्रम गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याची आयात करणे.
  • भाजीपाला बियाणे प्रक्रिया पॅकिंग साठवणी त्याच्या पायाभूत सुविधा नवीन भागाची स्थापना करणे.
  • फलोत्पादन यांत्रिकीकरण यासाठी आळिंबी उत्पादन, पुष्प उत्पादन, मसाला पिके लागवड करणे.
  • जुन्या फळबागांची पुनरुजीकरण करून उत्पादकतेत वाढ करणे
  • आंबा, संत्री, काजू, चिकू, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू,आवळा इत्यादीसाठी नियंत्रित शेती.
  • हरितगृह शेडनेट हाऊस, पक्षी रोधक जाळी, प्लास्टिक आच्छादन, प्लास्टिक टनल पॉलिहाऊस मधील उच्च दर्जाच्या भाजीपाला लागवड साहित्यासाठी व दुरुस्त्यासाठी अनुदान
  • पॉलिहाऊस मधील शेडनेट हाऊस मधील उच्च दर्जाच्या फुल पिकांच्या लागवड साहित्यासाठी व नियुक्त संख्या अनुदान दिले जाते.
  • सेंद्रिय शेती, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, परंपरागीकरणासाठी मधुमक्षिका पालन, एकात्मिक करणे पश्चात व्यवस्थापन.
  • फिरते पूर्व शीतकरण गृह, शीतगृह इत्यादीसाठी अनुदान दिले जाते. फलोत्पादन पिकासाठी पण सुविधा स्थापन करणे, शासकीय खाजगी सहकारी क्षेत्रात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सामायिक क्षेत्राने, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या बाबीवर अनुदान दिले जाते.

आवश्यक पात्रता

  1. शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे
  2. शेतकऱ्याकडे सातबारा प्रमाणपत्र, आठ अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  3. शेतकरी अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीतील जाती प्रवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  4. शेतकरी किंवा शेतकरी समूहाकडे फल उत्पादन पीक असणे आवश्यक.
  5. लाभार्थ्याने शेततळे अस्तरीकरणासाठी अधिकृत 500 मायक्रोनचे प्लास्टिक फिल्म वापरणे बंधकारक आहे.
  6. सामूहिक शेततळे घटकाचा लाभ शेतकरी समूहासाठी आहे, या समूहात दोन किंवा अधिक शेतकरी असावेत.
  7. शेतकरी संयुक्त कुटुंबातील नसावे
  8. शेतकऱ्यांची जमीन धरणे बाबतचे सातबारा खाते उतारा वेगवेगळे असावेत.
  9. शेततळ्यातील पाणी वापरण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणे बंधनकारक आहे.
  10. पूर्वी केलेले शेततळे, नैसर्गिक खड्डा आदी दगडाने बांधलेली विहीर इत्यादी जागी सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे, अस्तरीकरण मंजूर करण्यात येणार नाही.
  11. सामूहिक शेततळे या घटकाचा लाभ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव तसेच विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा व कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील अर्जदार पात्र राहतील.
  12. सामूहिक शेततळे या घटकाकरिता राज्यातील सर्व जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील अर्जदार पात्र राहतील मात्र वर दिलेले 25 जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना सामूहिक शेततळे हे घटक लागू राहणार नाही.

आवश्यक कागदपत्र

  1. सातबारा प्रमाणपत्र व आठ अ प्रमाणपत्र
  2. अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यासाठी जात प्रमाणपत्र
  3. खरेदी करण्याचे साधन उपकरणाचे कोटेशन किंवा बिल.

अर्ज कसा करावा

यासाठी (Rashtriy Falotpan Abhiyan 2025) ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता किंवा जवळच्या पंचायत समितीमध्ये जाऊन सुद्धा अर्ज सादर करू शकता.

  1. ऑनलाइन अर्ज साठी तुम्हाला https://mahadbt.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  2. नोंदणी करतेवेळेस तुमच्या आधाराची माहिती नीट भरावी आणि इतर आवश्यक माहिती टाकावी व नोंदणी करून घ्यावी नोंदणी झाल्यावर परत लॉगिन करून तुम्ही अर्ज भरू शकता.
  3. त्यानंतर तुम्ही यासाठी अर्जदाराची नोंदणी करून लॉगिन करून योजनेची निवड करावी लागेल आणि त्या योजनेसाठी अर्ज सादर करावा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.ही योजना कोणासाठी आहे?

Ans: ही योजना अनुसूचित जाती जमाती व इतर सर्व प्रकार वर्गासाठी लागू राहील.

2.या योजनेमध्ये कोणत्या बाबीसाठी अनुदान दिले जाते?

Ans: वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींसाठी सरकार तर्फे अनुदान दिले जाते.

3.माझ्याकडे यापूर्वी विहीर मला या योजनेसाठी अनुदान मिळेल का?

Ans: नाही, या योजनेमध्ये तुम्ही पात्र राहणार नाही वर नमूद केलेल्या पात्रता मध्ये तुम्ही बसत नसल्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *