PM Vishwakarma Yojana 2025 : पीएम विश्वकर्मा योजना 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे, विविध प्रकारचे काम करणार्यांना यामध्ये लाभ मिळतो जसे कि,सुतार,लोहार,कुंभार व इतर मजूर यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू झाली आहे.
या योजनेचा लाभ नेमका कोण घेऊ शकत या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय राहणार आहे, कीती रुपयांपर्यंत लाभ मिळेल याची माहिती तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता.
सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना आखत असते या योजनेचा माध्यमातून गरीब नागरिक यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी हा सरकारचा हेतू असतो, म्हणून पंतप्रधान विश्वकर्मा योजना सर्व गरजू आणि गरीब वर्गाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.
दरम्यान या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत कशी असेल या संदर्भातले सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
ज्या कारागिरांना बँकेमार्फत कर्ज मिल्ने खूप अवघड जात होते त्या कारागिरांची हि योजना अत्यंत उपयुक्त असणार आहे,या योजनेमधून तब्ब्ल ०३ लाखापर्यंत तुम्ही कर्ज घेऊन आणखी व्यवसाय वाढवू शकणार आहेत, तुम्ही या योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असाल तर लगेच अर्ज करू शकता.
Table of Contents
अर्ज कसा कराल?
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी अर्जदाराने विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे. या अर्जामध्ये तीन स्तरावर अर्जाची पडताळणी होते आणि त्यानंतर लाभार्थ्यांना ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थ्यांच्या अर्जाचे पडताळणी करण्यासाठी स्वातंत्र्य विभाग ठेवण्यात आलेला आहे.
ग्रामीण भागातल्या पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायती राज विभागाकडे देण्यात आलेली आहे आणि शहरी भागात प्रथम स्तरावर हे पडताळणी कार्यकारी अधिकारी करणार आहेत.
या योजनेचे फायदे
पंतप्रधान विश्वकर्मा योजना गरजू व गरिबांना चांगला फायदा देणारी योजना आहे या योजनेअंतर्गत पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या संबंधित तरुण कारागिरांना अठरा व्यवसायामध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण दरम्यान त्यांना पाचशे रुपये दररोज याप्रमाणे भत्ता देण्यात येणार आहे, प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना एक टूलकिट खरेदी करण्यासाठी वीस हजार रुपये दिले जातील याशिवाय त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकेमार्फत एक लाख रुपये ते तीन लाख रुपये पर्यंत कर्ज विनातारण, विनाहमी दिल जाणार आहे.
हे लाभ कोणाला मिळतात?
विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्याप्ती खाली दिलेल्या 18 बाबीमधील असणे गरजेचे आहे यामध्ये
- सुतार
- बोट किंवा नाव बनवणारे
- लोहार
- टाळा बनवणारे कारागीर
- सोनार
- कुंभार
- शिल्पकार
- मिस्त्री
- मच्छीमार
- टूलकिट निर्माता
- दगड फोडणारे मजूर
- मच्छी कारागीर
- टोपली/जाते घडवणारे
- बाहुल्या आणि इतर पारंपारिक खेळणी उत्पादक
- न्हावी
- हार बनवणारे
- धोबी
- शिंपी यांना हे लाभ (PM Vishwakarma Yojana 2025) दिले जाणार आहेत
या योजनेसाठी आवश्यक पात्रता
- लाभार्थी हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
- लाभार्थी विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एका क्षेत्रातील असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याचे वय 18 वर्षे पेक्षा जास्त आणि पन्नास वर्षापेक्षा कमी असावे.
- लाभार्थ्याकडे मान्यता प्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेड चे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- आवश्यक त्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज केलेला असणे आवश्यक आहे, कोणत्या जात प्रवर्गातून अर्ज करायचा याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आवश्यक कागदपत्रे
या योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, ट्रेडचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा,पासपोर्ट आकाराचा फोटो, बँकेचे पासबुक व मोबाईल नंबरची आवश्यकता असेल.
अर्ज कसा करावा?
- पीएम विश्वकर्मा योजनेच्या https://pmvishwakarma.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला जायचे आहे, अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना पर्याय तुम्हाला दिसेल येथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
- अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करायचा आहे यानंतर तुमची नोंदणी करून घ्यायची आहे
- नोंदणी क्रमांक व पासवर्ड तुमच्या मोबाईलवर मेसेज द्वारे पाठवला जाईल यानंतर मग नोंदणी फॉर्म पूर्णपणे पूर्णपणे व्यवस्थितरित्या वाचावा आणि योग्य रीतीने भरावा.
- भरलेला हा फॉर्म आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह स्कॅन करायचा आहे आणि त्यानंतर अपलोड करायचा आहे.
- हे सर्व माहिती अपलोड केल्यानंतर व्यवस्थित भरली का नाही चेक करून हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
1.मी योजनेसाठी कसा अर्ज करू शकतो?
Ans : वर नमूद केल्याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
2.मी कारागिरांकडे काम करणारा मजूर आहे,मला या योजनेचा लाभ घेता येईल का?
Ans: नाही, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कौशल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही लाभ घेऊ शकत नाही.
3.या योजनेमार्फत किती कर्ज मिळू शकेल?
Ans : तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला ०१ लाख ते ०३ लाखापर्यंत विनातारण कर्ज दिले जाणार आहे.
ज्या लोकांना काही हुनरयेत नाही त्याचं काय हुनरवाले तर पोट भार्तील्लाच पण माझ्या विचाराने ज्यांना हुनर नाही त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा हायला पाहुजे जेणे करून काही किराणा दुकान किव्वाइतर व्यवसाय करू टाकू आपला उदरनिर्वाह करतील