PM Krishi Sinchan Yojana 2025 : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रती थेंब अधिक पिक या सूक्ष्म सिंचन घटकांतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साठी अनुदान दिले जात आहे, ही योजना कृषी विभाग अंतर्गत राबविण्यात येत असून या विषयाची सविस्तर माहिती खाली आपण पाहणार आहोत.
Table of Contents
योजनेबद्दल माहिती
पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहान प्रणाली द्वारे थेंब थेंब पाणी देण्याचे आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचना या पद्धतीत जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो त्यापेक्षा कमी वेगाने पीकास पाणी दिले जाते.
मुख्य तो करून हे पाणी थेंबा थेंबाने दिले जाते ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या एकूण 60% ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केल्या गेलेल्या आहेत. तुषार सिंचन हे उपकरण पाणी शिंपडणारे म्हणून ओळखले जाते.
हे असे एक साधने जे शेती पिके,लॉन्स,भूदृश्य गोल्फ अभ्यासक्रम इतर भागात सिंचन करण्यासाठी वापरले जाते ते थंड करण्यासाठी आणि वायूच्या धूळ नियंत्रणासाठी देखील वापर केला जातो. तसेच सिंचन ही पावसा च्या पाण्याचा चांगल्या प्रकारे नियंत्रण पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा एक मार्ग आहे.
पाणी एक उपकरणाद्वारे वितरित केले जाते ज्यामध्ये पंप, वाल्व, पाईप व स्प्रिंकलर असू शकतात या सिंचनाचा वापर निवासी, औद्योगिक आणि शेतीसाठी केला जाऊ शकतो. जेव्हा पंपाच्या मदतीने मेन पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून हे पाणी बाहेर पडते आणि ते पिकावर शिंपडले जाते.
अनुदान
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर योजनेमध्ये लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या अनुदान दिले जाते हे अनुदानामध्ये दोन कॅटेगरी आहे त्यामधील एक अल्प अत्यल्पभूधारक शेतकरी व दुसरा इतर शेतकरी आहे.
यामध्ये अत्यल्प अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 55% एवढे अनुदान दिले जाते तर इतर शेतकऱ्यांसाठी 45% एवढे अनुदान दिले जाते सविस्तर फायदे विषयीची माहिती पीडीएफ (Click Here) मध्ये दिलेली आहे त्या पीडीएफ ला क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.
पात्रता (PM Krishi Sinchan Yojana 2025)
- या योजनेमध्ये जर तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर खालील पात्रता तुम्ही धारण केलेली असणे अत्यंत गरजेचे आहे जरी पात्रता तुम्ही धारण करत असाल तर तुम्ही या योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.
- शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे
- शेतकऱ्याकडे सातबारा प्रमाणपत्र आणि आठ अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- शेतकरी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाचा असेल तर त्याला जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
- जर लाभार्थ्यांनी 2016-17 च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबर साठी जर लाभ घेतला असेल त्याला पुढील दहा वर्षे त्या सर्वे नंबर वर कोणत्याही लाभ घेता येणार नाही आणि जर लाभार्थ्याने 2017-18 च्या नंतर या घटकांतर्गत कोणते विशिष्ट सर्वे नंबर साठी लाभ घेतला असेल तर त्याला पुढील सात वर्षे त्या सर्वे नंबर वर लाभ घेता येणार नाही यासाठी तुम्ही लाभ घेतला आहे की नाही हे चेक करणे महत्त्वाचे असणार आहे.
- शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याचा पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी यंत्र असणे आवश्यक आहे सोबतच त्यासाठी शेतकऱ्यांना वीजबिलाची ताजी प्रत सादर करणे गरजेचे असेल.
- सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीचे प्रतिनिधीने तयार केलेले असावी इतर कोणी केलेले असेल तर ते चालणार नाही
- शेतकऱ्यांना पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेपर्यंत लाभ देण्यात येईल.
- शेतकऱ्याला पूर्व मंजूरी मिळाल्यानंतर त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म सिंचन संच विकत घ्यावे व ते शेतामध्ये स्थापित करावे.
- पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर तीस दिवसाच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात त्यानंतरच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
या योजनेसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे शेतकऱ्यांना अर्ज सोबत जोडणे गरजेचे आहे त्यामध्ये सातबारा प्रमाणपत्र, आठ अ चा उतारा, वीज बिल मागील तीन महिन्याचे असावे, खरेदी केलेल्या संचाचे बिल आणि पूर्व मंजुरी पत्र अर्ज सोबत जोडणे आवश्यक असेल.
अर्ज कसा कराल
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल याची लिंक खाली दिलेली आहे.
- संकेतस्थळावर गेल्यानंतर शेतकरी योजनांमध्ये तुम्हाला प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटक हे योजना दिसेल.
- तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही त्यासाठी अर्ज सादर करू शकता.
हे अर्ज सादर केल्यानंतर सविस्तर माहिती तुम्हाला अर्ज भरते वेळेस दिली जाईल त्यानंतर आवश्यक ते फॉलोअप घेऊन तुम्हाला सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत या योजनेसाठी तुम्ही मोबाईल द्वारे सुद्धा करू शकता खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर तुम्हाला जायचं आहे त्या लिंक वर गेल्यानंतर तुम्ही सहजरीत्या अर्ज सादर करू शकणार आहात.
2 thoughts on “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शासनाकडून तुषार व ठिबक सिंचनावर 45% ते 55% पर्यंत अनुदान,अर्ज करण्याची पद्धत | PM Krishi Sinchan Yojana 2025”