Tata AIA Scholarship 2025 : टाटा AIA लाईफ इन्शुरन्स कडून 15000 रुपये शिष्यवृत्ती मिळत आहे;संधी सोडू नका! लगेचच अर्ज करा

TATA AIA Scholarship 2025: टाटा ए आय ए पारस स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 ट्रान्सजेंडर स्टूडेंट आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी टाटा ए आय ए कंपनी लिमिटेडच्या कॉर्पोरेट सोशियल रिस्पॉन्सिबिलिटी चालवण्यात येत आहे. यामध्ये जे ट्रांसजेंडर विद्यार्थी आहेत तसेच अपंग विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांना सांभाळता यावा यासाठी ही स्कॉलरशिप दिल्या जाते.

यामध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्यांना ही स्कॉलरशिप टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स मार्फत दिल्या जाते ही स्कॉलरशिप एकरकमी 15 हजार रुपये एवढी दिल्या जाणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे त्याची सविस्तर माहिती आवश्यक ती कागदपत्रे याची माहिती तुम्ही खाली पाहू शकता.

टाटा ए आय ए लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही टाटा सन्स ग्रुप यांची जॉईंट वेंचर कंपनी आहे, भारतभरामध्ये ही कंपनी इन्शुरन्स मध्ये मोठे कार्य करते. सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन टाटा ग्रुपने आतापर्यंत समाजाला भरपूर साहाय्य केले आहे आणि असेच साहाय्य टाटा ग्रुप नेहमी कोणत्या ना कोणत्या मार्गाने करत असतो.

या शिष्यवृत्तीसाठी तुम्ही पात्र असाल आणि गरजू असला तर खाली सविस्तर माहिती दिली आहे ते वाचा विधी केलेल्या तारखेअगोदर अर्ज सादर करा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याची सर्व माहिती इथे दिलेली आहे.

आवश्यक पात्रता

  1. जे विद्यार्थी पदवी च्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेला असतील.
  2. ट्रान्सजेंडर आणि अपंग अर्जदारांसाठी ही शिष्यवृत्ती खुली आहे.
  3. या शिष्यवृत्ती मध्ये अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
  4. संपूर्ण भारतभरातून कोणीहि विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतील.
  5. बडी फॉर स्टडी च्या कर्मचाऱ्यांचे पाल्य या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.

शिष्यवृत्तीचे फायदे

या शिष्यवृत्ती मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वन टाइम पंधरा हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती दिली जाते या शिष्यवृत्तीचा वापर तुम्ही शैक्षणिक खर्चासाठी करू शकता. ज्यामध्ये ट्युशन फीज, होस्टेल फीज, फूड, ट्रॅव्हल, इंटरनेट, डिव्हाईसेस, बुक किंवा स्टेशनरीचा समावेश असेल.

आवश्यक कागदपत्रे

  • अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटोग्राफ
  • अर्जदाराचा मार्कशीट तसेच मागच्या क्वालिफाईड एक्झाम चे गुणपत्रक
  • कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा (ज्यामध्ये प्रवेश पत्र किंवा संस्थेचे ओळखपत्र)
  • ओळखीचा पुरावा (ज्यामध्ये आधार कार्ड असेल)
  • पत्त्याचा पुरावा (ज्यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्ट्रिसिटी बिल.)
  • उत्पन्नाचा पुरावा (ज्यामध्ये आयटीआर, सॅलरी स्लिप, उत्पन्नाचा दाखला अधिकृत सरकारी अधिकाऱ्याने दिलेला)
  • बँक डिटेल्स अर्जदाराचे किंवा पालकांचे (ज्यात तुम्ही बँकेचे चेक किंवा पासबुक देऊ शकता)
  • स्टेटमेंट ऑफ पर्पज
  • अपंगाचा दाखला
  • ट्रान्सजेंडर आयडेंटिटी सर्टिफिकेट नॅशनल पोर्टलवरून दिलेले

अर्ज कसा कराल

या शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. https://www.buddy4study.com/page/tata-aia-paras-scholarship-programme या लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचा आहे, जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर सर्वप्रथम जीमेल अकाउंट, मोबाईल नंबर किंवा कोणताही ईमेल आयडी टाकून तुम्ही नोंदणी करून घेऊ शकता.

नोंदणी केल्यानंतर तुम्हाला टाटा ए आय ए पारस स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 (TATA AIA Scholarship 2025) एप्लीकेशन फॉर्म पेजवर रिडायरेक्ट केले जाईल. तिथे तुम्हाला स्टार्ट अप्लिकेशन या बटनाला क्लिक करावे लागेल व अर्ज भरण्याची प्रक्रियेला सुरुवात करावी लागेल.

आवश्यक ते सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित रित्या भरावी लागेल त्यानंतर विचारलेले सर्व कागदपत्रे नीट स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावे लागतील त्यांच्या नियम अटी तुम्हाला व्यवस्थित रित्या वाचून एक्सेप्ट कराव्या लागतील आणि अर्जाचा प्रीविव् पाहावा लागेल हा प्रीविव् तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही स्क्रीन माहिती व्यवस्थित भरली की नाही ते चेक करून अर्ज सबमिट करू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न? (FAQ’s)

1.या शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया कशी असेल?

Ans: या शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची सर्वप्रथम पडताळणी केल्या जाईल त्यानंतर ते आपल्या क्रायटेरियामध्ये बसते का नाही त्याच्यानुसार अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील, कागदपत्राच्या वेरिफिकेशन केल्या जाईल. टेलिफोनिक इंटरव्यू घेतल्या जातील व शॉर्टलिस्ट कॅन्डीडेटची कागदपत्र पडताळणी केले जाईल व उमेदवाराची निवड केल्या जाईल.

2.या शिष्यवृत्तीसाठी माझी निवड झाली तर मला ही रक्कम कशी मिळेल?

Ans: या शिष्यवृत्तीसाठी तुमची निवड झाल्यानंतर ही रक्कम तुम्ही नमूद केलेल्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केल्या जाईल

3.हि स्कॉलरशिप मला दरवर्षी मिळेल का?

Ans: नाही, ही स्कॉलरशिप फक्त वन टाइम स्कॉलरशिप आहे पुढच्या वर्षी तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार नाही.

4.मी एल जी बी टी क्यू कम्युनिटी मध्ये बिलॉन्ग करते मला यासाठी शिष्यवृत्ती मिळेल?

Ans : ट्रान्सजेंडर पीडब्ल्यूडी यांच्यासाठी ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता.

Leave a Comment