Mahindra Sarathi Abhiyan : महिंद्रा सारथी अभियानामार्फत ड्रायव्हरच्या मुलींना 10,000 रुपये आर्थिक साहाय्य मिळविण्याची संधी

Mahindra Sarathi Abhiyan 2025 : महिंद्रा अँड महिंद्रा कमर्शियल व्हेईकल अंतर्गत महिंद्रा सारथी अभियान मार्फत कमर्शियल गाड्या चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मुलींसाठी ज्या अकरावी, बारावी, वोकेशनल कोर्सेसला अथवा पॉलीटेक्निक डिप्लोमा, आयटीआय ला किंवा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांना दहा हजार रुपये एवढी स्कॉलरशिप एक रकमी दिल्या जाणार आहे.

निवड झाल्यानंतर विद्यार्थिनींना वन टाइम हे स्कॉलरशिप मिळणार आहे, महिंद्रा अँड महिंद्रा कमर्शियल व्हेईकल्स मध्ये जे ड्रायव्हर्स कमर्शिअल गाड्या चालवत असतील, ज्यामध्ये ट्रक्स, ट्रॅक्टर अथवा रिक्षा चालवत आहेत किंवा चारचाकी टॅक्सी चालवत आहेत अश्या ड्रायव्हर च्या पाल्यसाठी हे शिष्यवृत्ती राहणार आहे.

भारतातील कुठल्याही विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार आहे, 30 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार आहात.

महिंद्रा अँड महिंद्रा आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान राखून वेगवेगळ्या उपक्रमाअंतर्गत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करत असते, आपण आनंद महिंद्रा कश्याप्रकारे लोकांना प्रोत्साहन देतात हे ऑनलाईन नेहमीच वाचत असतो.

हि शिष्यवृत्तीसुद्धा सामाजिक जबादारी म्हणून महिंद्रा तर्फे दिल्या जाते,तुम्ही इच्छुक तसेच पात्र असाल तर दिलेल्या तारखेअगोदर ऑनलाईन अर्ज करून या रक्कम मिळवू शकता,सर्व माहिती खाली दिलेली आहे ती व्यवस्थित वाचून पुढची प्रक्रिया पार पाडावी

आवश्यक पात्रता

  1. इयत्ता अकरावी, बारावी, वोकेशनल कोर्सेस, पॉलिटेक्निक प्रोग्राम, डिप्लोमा, आयटीआय किंवा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या भारतातील सर्व विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
  2. फक्त कमर्शियल गाड्या चालवणाऱ्या ड्रायव्हरचे पाल्य या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार आहेत.
  3. ही शिष्यवृत्ती संपूर्ण भारतभरातील ड्रायव्हरच्या पाल्यासाठी खुली राहणार आहे.
  4. बडी फोर स्टडी आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी ही शिष्यवृत्ती लागू नाही.
  5. महिंद्रा टीम कडून ऑफलाइन पद्धतीने आलेल्या अर्जांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे.

शिष्यवृत्तीचे फायदे

या शिष्यवृत्तीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक रकमी दहा हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीचा वापर तुम्ही ट्युशन फी,पुस्तके,युनिफॉर्म व इतर शैक्षणिक खर्चसाठी करू शकणार आहेत.

आवश्यक कागदपत्रे

  1. विद्यार्थिनींचे ओळखपत्र (आधार कार्ड,वाहन चालविण्याचा परवाना अथवा पॅन कार्ड)
  2. दहावीचे गुणपत्रक
  3. सध्याच्या वर्गात शिकत आहेत त्याचे ओळखपत्र किंवा फी भरल्याचे पावती
  4. वडिलांचे ड्रायव्हिंग लायसन्स
  5. वडिलांचे आधार कार्ड
  6. बँकेचे पासबुक अथवा चेकबुक
  7. उत्पनाचा पुरावा (आवश्यक असल्यास)

अर्ज कसा करावा

  • या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे https://www.buddy4study.com/page/mahindra-saarthi-abhiyaan या लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय नाऊ बटन दिसेल त्यानंतर तुम्हाला बडी फोर स्टडीचे अकाउंट लॉगिन करायचे आहे.
  • बडी फॉर स्टडी चे अकाउंट तुम्ही बनवलेले नसल्यास हे अकाउंट तुम्ही मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा जीमेल अकाउंट ने नोंदणी करू शकता.
  • त्यानंतर तुम्हाला महिंद्रा सारथी अभियान या ॲप्लिकेशन पेजवर पाठवण्यात येईल, तिथे तुम्हाला स्टार्ट अप्लिकेशन या बटनाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या अर्जाची प्रक्रिया सुरू करायची आहे.
  • आवश्यक ती सर्व माहिती तुम्हाला या पोर्टलवर भरायची आहे त्यानंतर सांगितलेले सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
  • त्यांनी संकेतस्थळावर दाखवलेल्या नियम व अटी तुम्हाला एक्सेप्ट करायच्या आहेत आणि अर्जाचा प्रीविव् बघायचा आहे अर्ज च्या प्रीविव् मध्ये तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित भरलेली आहे की नाही हे तपासायच आहे आणि त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.

महिंद्रा मार्फत चालविल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये अर्ज करून दहा हजार रुपया पर्यंत रक्कम तुम्ही मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे कारण महिंद्रा अँड महिंद्रा ऑनलाईन आलेल्या अर्ज सर्वाधिक प्राधान्य देणार आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.मी सध्या नववीच्या वर्गात आहे मी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकते का?

Ans: नाही, ही स्कॉलरशिप फक्त दहावी आणि त्याच्या पुढील वर्गासाठी असल्यामुळे नवीतील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार नाहीत पुढील वर्षी तुम्ही अर्ज करू शकता.

2.या शिष्यवृत्तीमध्ये कोणते लाभ दिले जातात?

Ans: निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक रक्कमी दहा हजार रुपये एक वेळेस दिले जाते.

3.या शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया कशी आहे?

Ans: प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी होईल, त्यानंतर कागदपत्राची पडताळणी केल्या जाईल मोबाईल द्वारे मुलाखत घेतल्या जाईल व त्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र पडताळणी करून विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.

4.माझी निवड झाल्यावर मला या शिष्यवृत्तीचा लाभ कसा मिळेल?

Ans: निवड झालेल्या विद्यार्थ्याला त्याच्या बँक खात्यामध्ये हा लाभ हस्तांतरित केला जाईल त्यामुळे तुम्ही जे बँक खाते देणार आहेत चालू स्थितीतील असावे व अचूक अकाउंट ची माहिती नोंदवावी.

Leave a Comment