JK Tyre Scholarship 2025 : सरकारतर्फे आणि खाजगी संस्थेकडून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिष्यवृत्या दिल्या जातात परंतु हि माहिती अधिक जणांना राहत नाही म्हणून ते कोठेही अर्ज न करत शिक्षण शुल्क भरत असतात, परंतु खाजगी संस्थेकडून मिळणारे सर्व फायदे आणि शिष्यवृत्या पहिल्या तर अगदी पहिली पासून हे लाभ दिले जातात. अशीच एक शिष्यवृत्ती जेके टायर इंडस्ट्रीज लिमिटेड कडून दिल्या जाते त्याविषयी माहिती पाहुयात.
जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यामार्फत जेके टायर शिक्षण सारखी स्कॉलरशिप प्रोग्राम 2025-25 हे राबविण्यात येत आहेत, जे महिला उमेदवार शिक्षणासाठी धडपड करत आहेत व त्यांना पैशाची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिल्या जाते.
जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा टेक्निकल, नॉन टेक्निकल फिल्ड मध्ये शिक्षण घेत असतील व ते राज्यस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक किंवा तामिळनाडूमध्ये राहत असतील तर या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्या विद्यार्थ्यांना वन टाइम पंचवीस हजार रुपये एवढी स्कॉलरशिप जीके टायर आणि इंडस्ट्री लिमिटेड अंतर्गत दिल्या जाते.
जेके टायर इंडस्ट्री कडून घेण्यात येणाऱ्या या पुढाकारामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अधिक सोपे जाणार आहे, तुम्ही सुद्धा पात्र असाल आणि अर्ज करू इच्छित असाल तर सर्व माहिती नीट वाचा आणि 15 फेब्रुवारी 2025 अगोदर ऑनलाईन अर्ज सादर करा.
Table of Contents
आवश्यक पात्रता
- जड वाहने चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या सर्व विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
- त्यांनी नॉन टेक्निकल किंवा टेक्निकल अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेला असाव.
- विद्यार्थिनींना मागील वर्षी कमीत कमी 55% गुण मिळालेले असावे.
- विद्यार्थिनीच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असावे.
- विद्यार्थिनी ही राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक किंवा तमिळनाडूमध्ये राहणारी असावी.
- जेके टायर आणि बडी फॉर स्टडी च्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी ही शिष्यवृत्ती लागू नाही.
शिष्यवृत्ती चे फायदे
या शिष्यवृत्ती चे फायदे एकरकमी दिल्या जातात व एक वेळेसच ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्याला मिळणार आहे यामध्ये
- टेक्निकल अंडर ग्रॅज्युएट कोर्स साठी – 25000 रुपये
- नॉनटेक्निकल व डिप्लोमा कोर्सेस साठी – 15000 रुपये एवढी शिष्यवृत्ती दिल्या जाते.
आवश्यक कागदपत्र
- अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो
- प्रवेश घेतल्या चा पुरावा
- मागील वर्षाचे गुणपत्रक
- फी भरल्याची पावती फी स्ट्रक्चर सोबत
- शाळेकडून बोनाफाईड लेटर ज्यामध्ये संपूर्ण फी भरल्याचा उल्लेख असावा.
- दहावी बारावीचे मार्कशीट
- कुटुंबाच्या उत्पन्नाचा पुरावा (ज्यामध्ये आयटी रिटर्न, सॅलरी स्लिप, गव्हर्मेंट ऑथॉरिटी कडून मिळालेले लेटर जसे की ग्रामपंचायत वार्ड, कौन्सिलर, सरपंच, एचडीएम,डीएमसीओ किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला)
- ओळखीचे प्रमाणपत्र ज्यामध्ये (पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असेल)
- बँकेचे पासबुक
- तसेच पालक ड्रायव्हर असल्याच्या पुराव्यामध्ये कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन, हेवी मोटर वेहिकल ड्रायविंग (एचएमव्ही) चे लायसन किंवा श्रमिक कार्ड सोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा
- या शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. https://www.buddy4study.com/page/jk-tyre-shiksha-sarthi-scholarship-program या लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक करायचा आहे तिथे तुम्हाला तुमचा मेल आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
- जर तुमची नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला अगोदर नोंदणी करायला लागेल नोंदणी करण्यासाठी तुम्ही ईमेल, मोबाईल नंबर किंवा जीमेल चा वापर करू शकता.
- त्यानंतर तुम्हाला जे के टायर शिक्षा सारथी स्कॉलरशिप प्रोग्राम कडे वळवण्यात येईल तिथे तुम्हाला स्टार्ट अप्लिकेशन या बटनाला क्लिक करायचं आहे आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करायची आहे.
- विचारलेली सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरायची आहे विचारलेल्या सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
- त्यानंतर त्यांच्या नियम व अटी एक्सेप्ट करून अर्जाचा प्रीविव् बघायचा आहे अर्जाच्या प्रीविव् मध्ये तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थित आहे की नाही ते चेक करायची आहे आणि सबमिट या बटनाला क्लिक करून अर्ज सबमिट करायचा आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)
1.शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया कशी असेल?
Ans: प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी केल्या जाईल त्यानंतर कागदपत्राचे वेरिफिकेशन होईल, वेरिफिकेशन नंतर मोबाईल द्वारे मुलाखत घेतल्या जाईल आणि कागदपत्राची पडताळणी होऊन त्या उमेदवाराला शॉर्टलिस्ट केल्या जाईल. निवड झाल्यानंतर उमेदवाराला त्याची माहिती मोबाईलवर किंवा ई-मेल आयडीवर देण्यात येईल.
2.या शिष्यवृत्तीसाठी माझी निवड झाली तर शिष्यवृत्तीचे पैसे कसे मिळतील?
Ans: नमूद केलेल्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केल्या जाईल.
3.मी या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकते का?
Ans: हो, वर अर्ज करण्याची प्रक्रिया दिलेली आहे ती संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन अर्ज करण्यासाठीचे आहे त्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता