LOreal India Scholarship 2025 : लॉरियल इंडिया आपल्या सीएसआरच्या इनिशियेटिव्ह अंतर्गत लॉरियल इंडिया फॉर यंग वुमन इन सायन्स स्कॉलरशिप 2024-25 हे सादर करत आहे. यामध्ये जे तरुण महिला उमेदवार असतील तसेच त्याच बारावीचे शिक्षण झाले असेल आणि पुढच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असेल व हा प्रवेश सायन्स मध्ये घेतलेला असेल अशा महिला विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती लॉरियल इंडिया कडून दिल्या जाते.
ही शिष्यवृत्ती संपूर्ण भारतभरासाठी लागू असून विद्यार्थ्यांनीचे शिक्षण कमीत कमी बारावी झालेल्या असणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थिनीने मान्यता प्राप्त संस्थेमध्ये अंडरग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा पीएचडीसाठी सायन्स फिल्ड,लाइफ सायन्स, अप्लाइड सायन्स, इंजीनियरिंग, मेडिसिन, कॉस्मेटोलॉजी कॉस्मेटिक सायन्स किंवा फार्माकोलोजी इत्यादी मध्ये प्रवेश घेतलेला असेल तर ते या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतील त्यांच्या सीएसआर योजनेअंतर्गत हे शिष्यवृत्ती देते.
लॉरील इंडियाची स्थापना 2003 साली भारतात झालेली आहे. या शिष्यवृत्तीसाठी तुम्ही इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आवश्यक त्या सर्व पात्रता चेक कराव्यात आणि पात्र असाल तर दिनांक 05 फेब्रुवारी 2025 पूर्वी त्याच लिंकवरून ऑनलाईन अर्ज सादर करावा.
Table of Contents
आवश्यक पात्रता
- अर्जदार हा पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला शिकत असावा व हे पदवी सायन्स रिलेटेड असावी.
- अर्जदाराने बारावी सायन्स मधून पास होणे आवश्यक आहे.
- ही शिष्यवृत्ती भारतातील सर्व महिला विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.
- अर्जदाराने बारावी मध्ये कमीत कमी 85 टक्के गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असावे.
- संपूर्ण भारतभरा तील महिला विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतील.
- लॉरियल इंडिया आणि बडी फॉर स्टडी च्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती लागू नाही.
या शिष्यवृत्तीचे फायदे
या शिष्यवृत्तीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थिनींना 62500 रुपये एवढे आर्थिक सहाय्य (LOreal India Scholarship 2025) दिल्या जाते, याचा वापर तुम्ही शैक्षणिक खर्च,हॉस्टेल,आवश्यक शैक्षणिक सामुग्रीच्या खरेदीसाठी करू शकता.
आवश्यक कागदपत्रे
- ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा (ज्यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, वोटर आयडी कार्ड इत्यादी)
- सेल्फ अटेस्टेड उत्पन्नाचा पुरावा (ज्यामध्ये सरकारी अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला, परमनंट एम्प्लॉयरने दिलेले पगार पत्रक, मागील वर्षाचा आयटीआर किंवा फॉर्म 16)
- दहावी बारावीच्या गुणपत्रकाचे फोटो
- सेमिस्टर किंवा इयरली गुणपत्रकाचे फोटो
- सध्या प्रवेश घेतलेल्या चा पुरावा (ज्यामध्ये प्रवेश पत्र किंवा संस्थेची ओळखपत्र असेल)
- एक्सपेन्सेस रिसीट
- चालू वर्षाचे सायन्स रिलेटेड सर्टिफिकेट ज्यामध्ये एक्स्ट्रा क्युरिक्युलर ऍक्टिव्हिटी चा समावेश असेल.
- स्टेटमेंट ऑफ पर्पज
- अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटोग्राफ
- जर विद्यार्थ्यांचा मागील वर्षात चा निकाल अद्याप लागला नसेल अशा विद्यार्थ्यांचा त्या अगोदर चा निकाल या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल.
अर्ज कसा करावा
- या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळेल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://www.buddy4study.com/page/loreal-india-for-young-women-in-science-scholarships या लिंक वर जावे लागेल.
- या लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक करायचा आहे. बडी फोर स्टडीचे अकाउंट लॉगिन करायचे आहे.
- जर नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला मोबाईल नंबर, गुगल किंवा ई-मेल टाकून सर्वप्रथम नोंदणी करून घ्यायची आहे.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉरियल इंडिया यंग वुमन सायन्स स्कॉलरशिप 2024-25 या पेजवर पाठवण्यात येईल तिथे तुम्हाला हा अर्ज दिसेल.
- इथे स्टार्ट अप्लिकेशन या बटनाला क्लिक करायचं आहे व अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करायची आहे आवश्यक ती सगळी डिटेल्स तुम्हाला त्यामध्ये भरायच्या आहेत आवश्यक ते सगळे कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत.
- त्यांच्या टर्म कंडिशन्स तुम्हाला वाचायच्या आहेत आणि त्या एक्सेप्ट करायच्या आहेत. टर्म कंडिशन एक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला अर्ज चा प्रीविव् दिसेल तो प्रीविव् तुम्हाला व्यवस्थित रित्या पाहायचा आहे.
- अर्ज मध्ये तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थित आहे की नाही ते चेक करायच आहे आणि त्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.या शिष्यवृत्तीची रक्कम किती आहे?
Ans: या शिष्यवृत्तीची रक्कम शिक्षणानुसार 62 हजार 500 ते एक लाख रुपये एवढी राहणार आहे.
2.या शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया कशी असेल?
Ans : प्राप्त झालेल्या अर्जाचे पडताळणी करून त्यांचा टेलिफोनिक इंटरव्यू घेतल्या जाईल व त्यानंतर ज्युरी राऊंड होईल, व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे नंतर कागदपत्राची पडताळणी होऊन विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येईल.
3.माझी बारावी खाजगी इन्स्टिट्यूट मधून झालेले आहे मी या योजनेसाठी पात्र राहील का?
Ans: हो, तुम्ही बारावी जरी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये केलेली असेल आणि सध्या तुम्ही अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा पीएचडीसाठी ऍडमिशन घेतलेले असेल व ते ऍडमिशन वर नमूद केलेल्या कोणत्याही सायन्सच्या शाखेमध्ये घेतलेले असेल तर तुम्ही यासाठी पात्र राहणार आहे.