Rashtriy Ann Suraksha Abhiyan 2025 :राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामार्फत शेततळे,पंप व कीटकनाशकांसाठी सरकारी अनुदान;ऑनलाईन अर्ज करा

Rashtriy Ann Suraksha Abhiyan 2025 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्यातील बिया ऊस व कापूस योजना कृषी विभागांतर्गत चालवली जाते 2017 पासून राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेतील अभियाना बद्दल आढावा घेऊन बाराव्या पंचवार्षिक योजनेबद्दल सदर अभियानांतर्गत भात, गहू, कडधान्य व भरडधान्य पिकाचा समावेश या योजनेत करण्यात आला.

सन 2014-15 पासून बारावी पंचवार्षिक योजनेसाठीच्या मार्गदर्शक सूचनासह या कार्यक्रमाचे अंमलबजावणी करण्यात येत आहे सन 2018-19 ,19 -20 ही वर्ष केंद्र शासनाने पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे.

त्यास अनुसरून 18 -19 पासून केंद्र शासनाने पूर्वीच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान भरड धान्य अभियानात बदल करून दोन स्वातंत्र्य अभियान राबवण्याचे धोरण अंगीकारले आहे त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान भरडधान्य अंतर्गत मका पीक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पोस्ट तृणधान्य अंतर्गत ज्वारी, बाजरी व रागी या पिकांसाठी स्वातंत्र्य अभियान सुरू केले आहे या दोन अभियानासाठी अभियाननिहाय स्वातंत्र्य नियतव्य निर्धारित केलेले आहे.

योजनेसाठीचा अनुदान

या योजनेअंतर्गत शेतकऱ्याने बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सुषमा मूल्य द्रव्य एकात्मिक कीड व्यवस्थापन, पीक संरक्षणाविषयी कीटकनाशक, तणनाशके, वैयक्तिक शेततळे, पंप संच, पाईप, विविध कृषी अवजारे या बाबींना अनुदान देण्यात येते.

वैयक्तिक शेततळे, पंपसंच, पाईप या घटकाचा मिळणारा लाभ पाहायचा असेल तर खालील लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून सविस्तर माहिती पाहू शकता.

बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्यवस्थापन, सूक्ष्म मूल्य द्रव्य एकात्मिक कीड व्यवस्थापन, पीक संरक्षण औषधे यात जैविक घटक त्यांना नाशके यासाठी सुद्धा अनुदान दिले जाते.

आवश्यक पात्रता काय आहे? (Rashtriy Ann Suraksha Abhiyan 2025)

केंद्र शासनाने हि योजना आहे त्यानुसार या योजनेसाठी जिल्ह्याची निवड केलेली आहे त्यानुसार या योजनेसाठी जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील.

  • भात : नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
  • गहू : सोलापूर, बीड, नागपूर
  • कडधान्य : सर्व जिल्हे
  • भरडधान्य (मका) : सांगली, अहिल्यानगर, औरंगाबाद, जालना, नाशिक, धुळे व जळगाव.
  • तृणधान्य (ज्वारी, बाजरी, रागी, ज्वारी) : नाशिक, धुळे, नंदुरबार,जळगाव,अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा,सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ असे 29 जिल्हे.
  • बाजरी : नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद
  • रागी : नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे, रायगड व रत्नागिरी
  • कापूस : बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.
  • ऊस : औरंगाबाद, जालना ,बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी ,हिंगोली

जर एखादा शेतकरी तांदूळ, गहू, डाळी, कापूस यांच्या योजनेअंतर्गत येत असल्यास कोणत्या घटकासाठी अर्ज करत असेल तर दिलेले जिल्हे त्या घटकासाठी अनिवार्य राहतील.

इतर पात्रता

  • कोणत्याही बाबीसाठी फक्त एकच योजनेतून अनुदान मिळणार आहे.
  • शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मधून येत असेल तर त्याला जात प्रमाणपत्र आवश्यक असेल.
  • जर लाभार्थ्याला गळीत धान्य पिकं यामधून लाभ घ्यायचा असल्यास त्यांचे शेतात गळीत धान्य पिके असणे आवश्यक आहे आणि जर लाभार्थ्याला वृक्ष ज्यांनी तेल बियापिके यामधून लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्या शेतात तेलबिया लागवड असणे आवश्यक राहील.
  • संबंधी शेतकऱ्यांची स्वतःच्या नावे सातबारा व आठ अ चा उतारा असे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे

  1. सातबारा,आठ-अ प्रमाणपत्र
  2. खरेदी करण्याचे साधन उपकरणाचे कोटेशन
  3. पंप पाईप शेततळे या घटकाकरिता अनुसूचित जाती जमाती लाभार्थ्यासाठी जातीचे प्रमाणपत्र
  4. हमीपत्र व पूर्वसंमती पत्र

या योजनेविषयीची सविस्तर माहिती व शासनाचा निर्णय पहायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता व या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

अन्न सुरक्षेसाठी भारत सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या योजनांमार्फत सर्वसामान्यांसाठी अनुदान देत असते, हे अनुदान पार खेड्यापर्यंत पोहचायला खूप अवघड जात आहे यासाठी सर्वाना माहिती मिळावी म्हणून हा लेख प्रसिद्ध केला आहे हि सविस्तर माहिती वाचा आणि पात्र असाल तर अर्ज करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.या योजनेसाठी मी कोणत्या जिल्ह्यातून असणे आवश्यक आहे?

Ans : शासनाने जिल्हा निहाय पिकाची माहिती दिलेली आहे त्या जिल्हा निहाय तक्त्यामध्ये तुमचा जिल्हा येत असेल तर तुम्ही अनुदानासाठी पात्र असाल.

2.यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो का?

Ans: हो, महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

3.सातबारा व आठ-अ माझ्या नावावर नाही मी या योजनेचा लाभ घेऊ शकतो का?

Ans: नाही, यासाठी सातबारा व आठ तुमच्या स्वतःच्या नावावर असणे बंधनकारक आहे

Leave a Comment