PM Awas Yojana 2025 : प्रधानमंत्री आवास योजनेतून 3 कोटी घरे बांधणार!! अनुदानाच्या रक्कमेत सुद्धा मोठी वाढ

PM Awas Yojana 2025 : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पंतप्रधान पदाची शपथ घेतली पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे,सध्या चालू असलेल्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत आणखी तीन कोटी घर बांधण्यावर एकमत दरविण्यात आले आहे.

पुढील पाच वर्षाच्या कालावधी मध्ये आणखी तीन कोटी घरे बांधण्यात येणार आहेत,या योजनेमार्फत पात्र लाभार्थ्यांना घर बांधून दिले जाते किंवा त्यांना आर्थिक मदत केली जाते, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आता घरासोबतच शौचालय, विज व एलपीजी कनेक्शन, नळ जोडणी असे सगळ्या सुविधा दिल्या जाणार आहेत.

त्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आवास योजना नेमकी काय आहे व या योजनेमध्ये कशाप्रकारे लाभ मिळतो, त्यासाठी काय आवश्यक कागदपत्रे आपल्याला लागतात याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

पीएम आवास योजना काय आहे?

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लोकांना घर बांधून दिले जाते तसेच त्यांना आर्थिक मदत सुद्धा केली जाते या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये दिले जातात. देशातील गरीब लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत गरीब गरजू लाभार्थ्यांना हे अर्थसहाय्य दिले जाते या योजनेचा 2024 मध्ये विस्तार करण्यात आलेला आहे,गरीबापासून ते मध्यमवर्ग पर्यंतच्या नागरिकांना त्याचे घर मिळावे यासाठी या योजनेतून त्यांना निधी दिला जाणार आहे.

हा लाभ वेगवेगळ्या उत्पन्नावर आधारित असून त्यानुसार या योजनेचे वेगवेगळे गट पाडण्यात आलेले आहे व त्या गटानुसार घरासाठी कर्ज दिले जाणार आहे. अगोदर पंतप्रधान योजना आवास योजना अंतर्गत या कर्जाची रक्कम तीन ते सहा लाख रुपये आहे.

आता ही रक्कम आणि या रकमेवर अनुदान सुद्धा मिळणार आहे, आता या कर्जाची रक्कम 18 लाख रुपये पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

अर्ज कसा करावा?

पंतप्रधान आवास योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन/ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा याविषयीची माहिती पाहूयात पंतप्रधान आवास योजनेसाठी (PM Awas Yojana 2025) तुम्ही कोणत्या उत्पन्न गटात येत आहे अगोदर ठरवणे गरजेचे आहे.

त्यांच्या उत्पन्नाचे गट कशाप्रकारे आहेत याची माहिती तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता. त्यानंतर पीएम आवास योजनेच्या https://pmaymis.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे त्यांच्या मुख्य मेनू मध्ये तुम्हाला सिटीजन असेसमेंट हे पर्याय दिसेल या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

आणि त्यानंतर अर्जदार या पर्यायाला तुम्हाला सिलेक्ट करायच आहे त्यानंतर नवीन एक विंडो ओपन होईल तिथे तुमचा आधारचा नंबर टाकायचा आहे व सविस्तर वैयक्तिक माहिती तुम्हाला त्यामध्ये भरायचे आहे.

तुमची वैयक्तिक माहिती तुमच्या बँक खात्याचा संदर्भातील माहिती तुम्हाला तिथे टाकायची आहे. तुमच्या सध्याच्या घराचा पत्ता याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे भरायची आहे.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक कोड विचारला जातो तो कोड तुम्हाला टाकायचा आहे आणि ही माहिती व्हेरिफाय करून सबमिट करायची आहे.

लागणारे आवश्यक कागदपत्रे

पीएम आवास योजना मध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी काहि आवश्यक कागदपत्राची गरज आहे हे कागदपत्र तुम्हाला व्यवस्थित रित्या स्कॅन करून संबंधित पर्यायावर अपलोड करायचे आहेत. या कागदपत्रामध्ये खालील कागदपत्राचा समावेश आहे.

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. मतदान कार्ड
  4. रहिवासी प्रमाणपत्र हे कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
  5. यासोबतच तुमच्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला, पगार पत्रक किंवा फॉर्म 16 तुम्ही अपलोड करू शकता.
  6. बँक खात्याची स्टेटमेंट किंवा मागील तीन वर्षाचे ITR सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता.

मिळणारे लाभ

ही योजना वेगवेगळ्या गटांसाठी केंद्र शासनातर्फे चालवल्या जाते या योजनेमध्ये 200000 पर्यंत घर घेण्यासाठी तर 18 लाखापर्यंत घर बांधून देण्यासाठी तुम्हाला कर्ज दिले जाते.

या कर्जावर 2 लाख 60 हजार सुद्धा केंद्र शासनातर्फे दिल्या जाते तुम्ही सुद्धा या योजनेमध्ये अर्ज करण्याची इच्छुक असाल तर वर दिल्यानुसार व्यवस्थित रित्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑफलाइन पद्धतीने तुम्ही तुमच्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची संपर्क साधू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.मी नवीन फ्लॅट खरेदी करत आहे मला या योजनेचा लाभ घेता येईल का?

Ans: हो, तुम्ही नवीन फ्लॅट घेत असाल आणि या अगोदर तुमच्या नावावर कोणतेहि घर नसेल तर तुम्हाला दोन लाख साठ हजार रुपये एवढे अनुदान सरकारतर्फे दिले जाते.

2.मी अगोदर प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतलेला आहे परत घेऊ शकतो का?

Ans: नाही, या योजनेचा लाभ तुम्ही भविष्यात एकदाच घेऊ शकता.

3.या योजनेची अर्जाची प्रक्रिया कशी असेल?

Ans: या योजनेमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात किंवा ऑफलाइन पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेची संपर्क साधून सुद्धा अर्ज भरू शकता.

Leave a Comment