Flipkart Foundation Scholarship : फ्लिपकार्ट फाउंडेशन मार्फत होतकरू विद्यार्थ्यांना 50000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार! वाचा सविस्तर

Flipkart Foundation Scholarship : ऑनलाइन जगतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नाव म्हणजे फ्लिपकार्ट. फ्लिपकार्ट अंतर्गत विविध प्रकारच्या ऑनलाइन सुविधा आपल्याला दिल्या जातात यासोबतच फ्लिपकार्ट फाउंडेशन मार्फत शिष्यवृत्ती सुद्धा विद्यार्थ्यांना दिली जाते.
फ्लिपकार्ट मध्ये किराणा स्टोअर वाल्यांचा मोठा समूह काम करत असतो या समूहासाठी फ्लिपकार्ट फाउंडेशन स्कॉलरशिप 2024-25 अंतर्गत किराणा स्टोअर च्या मालकाच्या मुलींसाठी ही स्कॉलरशिप राहणार आहे.
 उच्च शिक्षणासाठी या मुलींना कोणत्याही पैशाची कमतरता भासू नये किंवा कोणत्या सुविधाची कमतरता भासू  नये यासाठी फ्लिपकार्ट फाउंडेशन मार्फत ही शिष्यवृत्ती दिले जाते. पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनी साठी हे शिष्यवृत्ती लागू असून ही शिष्यवृत्ती सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग किंवा मॅथ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनी साठी राहणार आहे.
 ही शिष्यवृत्ती एक रकमे असून एकदाच शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी जे पात्रता मिळणारे फायदे आवश्यक ती कागदपत्रे अर्ज कशा पद्धतीने करायचा  याविषयीची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे त्यासोबतच ऑनलाइन अर्ज ची लिंक सुद्धा दिलेली आहे या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

अर्ज करण्यासाठी पात्रता

  • फ्लिपकार्ट फाउंडेशन मार्फत दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग किंवा गणित मध्ये सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
  •  विद्यार्थ्यांचे पालक किराणा स्टोअर चे मालक असावे.
  • विद्यार्थ्यांना बारावी मध्ये कमीत कमी 60% गुणा असावेत.
  •  विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न पाच लाखापेक्षा जास्त असू नये.
  •  फ्लिपकार्ट ग्रुप तसेच बडी फॉर स्टडीचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाहीत.

 या शिष्यवृत्ती चे फायदे

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकरकमी 50 हजार रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे या रकमेचा वापर तुम्ही शैक्षणिक खर्चासाठी, शाळेची फी भरण्यासाठी, परीक्षेची फी भरण्यासाठी, हॉस्टेलची फी भरण्यासाठी, पुस्तके वह्या, जाण्या-याण्याचा खर्च, राहण्यासाठी करू शकणार आहात.

आवश्यक कागदपत्रे

  1. अर्ज सादर करते वेळेस तुम्हाला खाली नमूद केलेले कागदपत्रे सोबत जोडायचे आहेत.
  2. अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटोग्राफ
  3. कॉलेज इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा यामध्ये ऍडमिशन लेटर इन्स्टिट्यूट च्या आयडी कार्ड तुम्ही देऊ शकता.
  4.  बारावीचे गुणपत्रक
  5. पालकाचा उत्पन्नाचा दाखला यामध्ये इन्कम सर्टिफिकेट जे सरकारी खात्याने दिलेल्या असेल ते लावू शकतात.
  6.  किराणा स्टोअरचे मालक असल्याचा पुरावा यामध्ये तुम्ही शॉप ॲक्ट लायसन, इन्टिटी रजिस्ट्रेशन, जीएसटी रजिस्ट्रेशन इत्यादी कागदपत्रे जोडू शकता.
  7.  ओळखीचे प्रमाणपत्र यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना जोडू शकता.
  8.  डिझॅबिलिटी सर्टिफिकेट आवश्यक असेल तर (सरकारी खात्याने दिलेले असावे)
  9.  तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या खर्चाच्या पावत्या तुम्हाला सोबत जोडायच्या आहेत
  10. विद्यार्थ्यांचे बँकेचे पासबुक सुद्धा सोबत जोडायचे आहेत.

 अर्ज कसा करावा

  1. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या https://www.buddy4study.com/page/flipkart-foundation-scholarship-program लिंक वर जायचं आहे.
  2. या लिंक वर गेल्यानंतर लॉगिन करायचा आहे अगोदर नोंदणी केलेली नसेल तर ई-मेल, मोबाईल नंबर किंवा जीमेलने तुम्ही नोंदणी करू शकता.
  3. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचं आहे.
  4. लॉगिन केल्यानंतर फ्लिपकार्ट स्कॉलरशिप 2024-25 हा पर्याय दिसेल तेथे तुम्हाला क्लिक करायच आहे आणि अप्लाय नऊ या बटनाला क्लिक करून ॲप्लिकेशन भरणे सुरू करायचा आहे.
  5. यामध्ये सर्व माहिती व्यवस्थितरित्या तुम्हाला भरायची आहे आवश्यक ते सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्यांच्या टर्म कंडिशन्स एकदा वाचून एक्सेप्ट करायच्या आहेत आणि त्यानंतर भरलेल्या फॉर्मचा प्रीविव् बघून अर्ज सबमिट करायचा आहे.
  6. अर्ज सबमिट करण्याअगोदर सविस्तर माहिती व्यवस्थित रित्या वाचून घ्यावी आणि पात्रता धारण करत असल्यास अर्ज सादर करावा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1.या शिष्यवृत्तीसाठी ची निवड प्रक्रिया कशी असेल?
Ans : या शिष्यवृत्ती मध्ये तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर पात्रतेनुसार अर्ज तपासणी केल्या जाईल फोन द्वारे किंवा ऑनलाईन विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाईल त्यानंतर कागदपत्राची पडताळणी केली जाईल, फिजिकल व्हेरिफिकेशन काही विद्यार्थ्यांचे होऊ शकतात आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड केल्या जाते.
Q2.मला किती शिष्यवृत्ती मिळते?
Ans: विद्यार्थ्यांचे निवड झाल्यास विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती एक रकमी दिल्या जाते.
Q3.ही शिष्यवृत्ती मला प्रत्येक वर्षी दिली जाईल का? 
Ans : ही शिष्यवृत्ती एकरकमी आणि एकदाच दिली जाते आवश्यकता असल्यास दुसऱ्या वर्षी तुम्ही अर्ज करू शकता दुसऱ्या वर्षी शिष्यवृत्ती देणे किंवा नाही देणे याचा सर्व निर्णय फ्लिपकार्ट फाऊंडेशनवर अवलंबून आहे.

Leave a Comment