Eklavya Scholarship 2025 : पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 5000 रुपये शिष्यवृत्ती;असा करा अर्ज

Eklavya Scholarship 2025 : महाराष्ट्र सरकारमार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात तसेच विविध प्रकारे विद्यार्थ्यांना अर्थ साहाय्य सुद्धा दिले जाते, शासनातर्फे येणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येते तसेच त्याचे शासन निर्णय सुद्धा पारित केले जात.

अशाच प्रकारची एक शिष्यवृत्ती महाराष्ट्र सरकारमार्फत चालविली जाते आणि यासाठी दरवर्षी गरीब तसेच होतकरू विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्ती मध्ये केली जाते, ती शिष्यवृत्ती म्हणजे एकलव्य शिष्यवृत्ती.

महाराष्ट्र शासनामार्फत एकलव्य स्कॉलरशिप 2024-25 चालविल्या जात असून हे स्कॉलरशिप कायद्यामध्ये, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या अर्जदार विद्यार्थ्यांना देण्यात येते.

यामध्ये त्या विद्यार्थ्याला पाच हजार रुपये एवढे आर्थिक साहाय्य दिल्या जाते यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. याची सविस्तर माहिती तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या आपले सरकार डीबीटी पोर्टलवरून सुद्धा घेऊ शकता.

बाकीची सर्व माहिती खाली दिलेली आहे, अर्ज करण्या अगोदर विद्यार्थ्याने संपूर्ण माहिती चेक करावी आणि त्यानंतर आपली पात्रता तपासून खाली दिलेल्या पद्धतीने अर्ज सादर करावा, अर्ज करतेवेळेस सर्व माहिती अचूक भरावी आणि विहित तारखेअगोदर हे अर्ज जमा होईल याची खात्री करावी.

आवश्यक पात्रता

  1. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याने पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेला असावा.
  2. अर्जदाराने मागच्या वर्षी कमीत कमी 60 टक्के गुण मिळवलेले असावे .
  3. अर्जदार विद्यार्थ्याने लॉ, कॉमर्स किंवा आर्ट्समध्ये प्रवेश घेतलेला असेल तर.
  4. अर्जदाराने सायन्स मध्ये प्रवेश घेतलेला असेल तर तो 70 टक्के गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे.
  5. ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे ती महाराष्ट्र शासनाची अधिकृत किंवा मान्यता प्राप्त संस्था असणे गरजेचे आहे.
  6. अर्जदाराच्या कुटुंबाची एकूण उत्पन्न 75 हजार किंवा त्याच्यापेक्षा कमी असावे.
  7. अर्जदार हा कुठेही पूर्णवेळ किंवा अर्धवेळ काम करणारा नसावा.
  8. महाराष्ट्रात बाहेरील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाहीत.

शिष्यवृत्ती चे फायदे

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकरकमी पाच हजार रुपये एवढे आर्थिक साहाय दिले जाणार आहे.या पैशाचा उपयोग तुम्ही शैक्षणिक खर्चासाठी,शुल्क भरण्यासाठी व इतर शिक्षणासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी करू शकता.

आवश्यक कागदपत्र

या शिष्यवृत्ती मध्ये ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला आवश्यक ते कागदपत्र अपलोड करणे गरजेचे आहे अर्ज करते वेळेस खाली दिलेले कागदपत्रे नीट स्कॅन करून अपलोड करावीत.

  1. अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो
  2. आधार कार्ड
  3. पत्त्याचा पुरावा
  4. उत्पन्नाचा दाखला (तहसीलदाराने दिलेला असावा)
  5. मार्कशीट किंवा मागच्या परीक्षेचे गुणपत्रक
  6. अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत.

अर्ज कसा कराल

  1. जे अर्जदार या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील त्यांनी https://www.buddy4study.com/scholarship/eklavya-scholarship-maharashtra या लिंकवर जाऊन अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक करायचं आहे.
  2. तिथे गेल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करायच आहे रजिस्टर केलेले नसेल तर म्हणजे नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला जीमेल, मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून सर्वप्रथम नोंदणी करायची आहे.
  3. त्यानंतर न्यू एप्लीकंट रजिस्ट्रेशन या बटनाला क्लिक करायचं आहे जो उजव्या साईडला दिलेल आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आवश्यक ते सर्व माहिती भरायची आहे.
  4. तुमचा ईमेल आयडी, फोन नंबर व्हेरिफाय करायचा आहे आणि कॅपच्या दिलेला तो कॅपचा तुम्हाला टाकायचा आहे आणि रजिस्टर करायच आहे.
  5. सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एप्लीकंट लॉगिन या बटनाला क्लिक करायचा आहे त्यानंतर लॉगिन मध्ये युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करायचे आहे.
  6. ही लॉगिन केल्यानंतर आवश्यक ते सर्व माहिती भरायची आहे, आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आणि अर्ज सबमिट करायचा आहे. हा अर्ज 31 मार्च 2025 पूर्वी तुम्हाला सादर करायचा आहे हे विद्यार्थ्याने ध्यानात घ्यावे.

गरीब तसेच होतकरू विद्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती सरकारमार्फत दिल्या जाणार आहे,यासाठी लवकरात लवकर अर्ज सादर करून आर्थिक सहाय्याचा लाभ घ्यावा, हा अर्ज ऑनलाईन भरू शकता यासाठी मोबाईलचा वापर करू शकता.

जर अर्ज ऑनलाईन तुम्हाला भरता येत नसेल तर तुम्ही जवळच्या महा इ सेवा केंद्रावर जाऊन हा अर्ज भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. सरकारची चवली योजना विद्यार्थ्यांसाठी चालू झालेली आहे,त्यामुळे पात्र अर्जदाराने हयगय न करत त्वरित अर्ज सादर करावा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.या शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया कशी असेल?

Ans: ज्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळालेले असतील अशा विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्तीसाठी केल्या जाईल.

2.या शिष्यवृत्तीसाठी आम्ही ऑफलाइन पद्धतीने कोणाशी संपर्क साधू शकतो का?

Ans: हो, डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र, 411 फोर्थ फ्लोर, मंत्रालय नरिमन पॉइंट मुंबई 400 032 येथून माहिती घेऊ शकता.

Leave a Comment