ZS Scholarship 2025 : झेड एस असोसिएट कडून पुणे,चेन्नई,दिल्ली व बंगलोर येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ५०००० रुपये शिष्यवृत्ती

ZS Scholarship 2025 : झेड एस असोसिएट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत झेड स्कॉलर प्रोग्राम 2024-25 (ZScholars Program 2024-25) हा इनिशिएटिव्ह राबविण्यात येत आहे यामध्ये जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी या कंपनीमार्फत 50000 पर्यंत दरवर्षी सहाय्य केले जाते.

हे सहाय्य दिल्ली, पुणे, चेन्नई आणि बेंगळूर येथे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जात आहे, यासाठी विद्यार्थी हा जनरल किंवा प्रोफेशनल पदवीधर अभ्यासक्रमामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठात प्रवेश घेतलेला असणार आवश्यक आहे.

झेड एस अससोसिएट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही मॅनेजमेंट अँड कन्सल्टिंग टेक्नॉलॉजी मधील कंपनी आहे त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ही कंपनी हा पुढाकार घेत आहे, या मार्फत विद्यार्थी यांना पन्नास हजार रुपये दरवर्षी आर्थिक सहाय्य दिले जाते यासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक पात्रता

  • संपूर्ण भारतातील उमेदवार जे अंडर ग्रॅजुएट अभ्यासक्रमात पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेला असेल व ते दिल्ली, पुणे, चेन्नई, बंगलोर येथे शिकत असतील असे.
  • बीए, बीकॉम, बीएड, बी फार्म, बीएससी, बॅचलर ऑफ सायन्स, सोशल वर्क्स, बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन, बीबीए,बीबीएम, एमबीबीएस,बीसीए आणि बीएससी आयटी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती राहणार आहे.
  • उमेदवाराने मागच्या वर्षी किमान 60 टक्के गुण मिळवलेले असावे.
  • विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे.
  • झेड एस व बडी फोर स्टडी च्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती लागू नाही.

शिष्यवृत्तीचे फायदे

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 20 हजार रुपये ते 50 हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती दिल्या जाते. या शिष्यवृत्ती चा वापर तुम्ही शैक्षणिक खर्चासाठी ट्युशन फी, ऍडमिशन फी, एक्झाम फी, बुक्स, होस्टेल फी, युनिफॉर्म, लॅपटॉप, मोबाईल असे इक्विपमेंट घेण्यासाठी वापरू शकता.

आवश्यक कागदपत्रे

  1. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. त्या कागदपत्रांमध्ये
  2. बारावीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  3. सरकारी ओळखपत्र (ज्यामध्ये आधार कार्ड, वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन व पॅन कार्ड असेल)
  4. सध्याच्या वर्षी प्रवेश घेतल्याचा पुरावा (ज्यामध्ये फी भरण्याची पावती,प्रवेश पत्र, इन्स्टिट्यूटच्या आयडेंटी कार्ड, बोनाफाईड सर्टिफिकेट इत्यादी राहील.
  5. कुटुंबाचे उत्पन्नाचा पुरावा (ज्यामध्ये आयटीआर, फॉर्म 16 किंवा सरकारी अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचा दाखला)
  6. बँक अकाउंट डिटेल्स (ज्यामध्ये बँकेचे पासबुक असेल किंवा कॅन्सल चेक देऊ शकता)
  7. अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो.

अर्ज कसा कराल?

  1. या शिष्यवृत्ती मध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला https://www.buddy4study.com/page/zscholars-program या लिंक वर जायचं आहे.
  2. या लिंक वर गेल्यावर अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक करायचं आहे, तिथे तुम्हाला बडी फॉर स्टडीचे अकाउंट लॉगिन करायचे आहे.
  3. अकाउंट लॉगिन करण्या अगोदर तुम्ही नोंदणी केली की नाही हे तुम्हाला तपासायचे आहे नोंदणी केली नसेल तर तुम्ही मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा जीमेल अकाउंट टाकून आपली नोंदणी करून घेऊ शकता.
  4. त्यानंतर तुम्ही लॉगिन करून झेड एस स्कॉलर प्रोग्राम 2024-25 (ZS Scholarship 2025) या ॲप्लिकेशनच्या पेजवर याल तिथे तुम्हाला स्टार्ट अप्लिकेशन या बटनाला क्लिक करायचं आहे आणि अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
  5. आवश्यक ते सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित रित्या ऑनलाइन एप्लीकेशन मध्ये भरायची आहे यामध्ये सांगितलेले सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड करायच्या आहेत.
  6. त्यांच्या नियम व अटी व्यवस्थित रित्या वाचून तुम्हाला एक्सेप्ट बटनाला क्लिक करायचं आहे आणि अर्ज चा प्रीविव् बघायचा आहे.
  7. संपूर्ण माहिती व्यवस्थित भरलेले आहे की नाही हे तुम्हाला पाहायचं आहे आणि त्यानंतर भरलेला अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे अपूर्ण अर्ज सबमिट केला तर त्या उमेदवारांची निवड होणार नाही याची नोंद घ्यावी.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.या स्कॉलरशिप ची निवड प्रक्रिया कशी असेल?

Ans : सर्वप्रथम आलेल्या अर्जाची तपासणी केली जाईल विद्यार्थ्याचे बॅकग्राऊंड चेक केले जाईल त्या विद्यार्थ्याचे टेलिफोनिक इंटरव्यू घेतला जाईल व विद्यार्थी जे शॉर्टलिस्ट होतील त्यांच्या कागदपत्राची पडताळणी केल्या जाईल. ऑनलाईन ऍप्टिट्यूड टेस्ट घेतल्या जाईल आणि त्यानंतर विद्यार्थी शॉर्टलिस्ट केले जातील व टेलिफोनिक मुलाखत होईल व त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड केल्या जाईल.

2.या शिष्यवृत्ती मध्ये निवड झाल्यानंतर रक्कम मला कशी मिळेल?

Ans: या शिष्यवृत्ती मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येईल.

3.मी सध्या बीटेक च्या दुसऱ्या वर्षाला आयआयटी लखनऊ येथून शिक्षण घेत आहे मी या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहील का?

Ans: नाही, फक्त जे विद्यार्थी पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेले असतील अशा विद्यार्थ्यांसाठी आहे व हे इन्स्टिट्यूट दिल्ली, पुणे, चेन्नई किंवा बेंगलोर येथील असणे आवश्यक आहे.

Leave a Comment