Krishi Yantrikikaran Yojana 2025 : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना चालवल्या जाते कृषीयांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ प्रति हेक्टर पर्यंत वाढवने हा आहे.
हा योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतीमधील ऊर्जेचा वापर खूप कमी आहे अश्या क्षेत्रांमध्ये व अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचवावा यासाठी योजना राबवण्यात येते.
प्रात्यक्षिके व मनुष्यबळ विकासद्वारे सहभागीदारामध्ये जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश असणार आहे. कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देणे तसेच प्रात्यक्षिकाद्वारे सहभाग घेणाऱ्यांना कृषी यंत्रिकीकरणाचे प्रोत्साहन देणे हे या योजनेचे धोरण राहणार आहे.
या योजनेतून विविध यांत्रिक अवजारे व कृषी यंत्र तुम्ही खरेदी करू शकता यासाठी सरकारकडून आर्थिक सहायय देण्यात येते. यामध्ये ट्रॅक्टर, पावर ट्रेलर, ट्रॅक्टर पावर टिलर चलित अवजारे,बैल चलित यंत्र अवजार, मनुष्यचलित यंत्र अवजारे, प्रक्रिया संच, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फलोत्पादन यंत्र व अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे, स्वयंचलित यंत्रे तसेच भाडेतत्त्वावरील सुविधा केंद्र, कृषी अवजार बँकेची स्थापना, उच्चतंत्रज्ञान व उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना यासाठी सुद्धा सरकारतर्फे अनुदान देण्यात येते.
या योजनेचे कोणाला किती लाभ मिळणार आहे याविषयीची माहिती खालील दिलेल्या PDF मध्ये आहे या (PDF) लिंकवर उपलब्ध आहेत लिंक वर जाऊन तुम्ही याविषयीची सविस्तर माहिती घेऊ शकता.शेतकऱ्यांसाठी विविध यंत्रे तसेच अवजारे पुरविण्यासाठी सरकारने खूप चांगली योजना आणलेली आहे, पात्र शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घ्यावा.
Table of Contents
आवश्यक पात्रता (Krishi Yantrikikaran Yojana)
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- त्यासोबतच सातबारा उतारा 8अ असावा.
- शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील असल्यास जातीचा दाखला दाखवणे आवश्यक असेल.
- फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहणार आहे म्हणजे ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार यासाठी तुम्ही अनुदान घेऊ शकता.
- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टर चलित अवजारांसाठी लाभ मिळण्यास पात्र असाल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक राहील.
- एखाद्या घटकाच्या अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटकातील अवजारासाठी पुढील दहा वर्षा अर्ज करता येणार नाही परंतु इतर अवजारासाठी अर्ज करता येईल.
- उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याला 2018-19 साली ट्रॅक्टर साठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील दहा वर्ष ट्रॅक्टर साठी लाभ मिळणार नाही. 19-20 मध्ये इतर कोणत्याही अवजारासाठी हे शेतकरी पात्र राहतील.
आवश्यक कागदपत्र
तुम्हाला अर्ज करताना काही महत्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील त्यानंतरच तुम्हाला हा लाभ देण्यात येणार आहे कागदपत्रे न देता तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
- आधार कार्ड
- सातबारा उतारा दाखला
- खरेदी करायचा अवजाराच्या कोटेशन
- केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त तपासणी संस्थेने दिल्याने तपासणी अहवाल
- जातीचा दाखला
- स्वयंघोषणापत्र
- पूर्व संमती पत्र
अर्ज कसा करावा?
योजनेचे सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे या योजनेची सविस्तर माहिती घेऊन तुम्ही जवळच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन अर्ज सादर करू शकतात. किंवा ऑनलाईन पद्धतीने https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या लिंकवरून अर्ज दाखल करू शकता.
याविषयीचा शासन निर्णय येथे दिलेला आहे तो पूर्णपणे नीट वाचून अर्जाची प्रक्रिया करावी,यासोबतच यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येऊ शकतो ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी चे अधिकृत संकेतस्थळात भेट देऊन तुमची नोंदणी करून घ्यायची आहे त्यानंतर या योजनेसाठी अर्ज सादर करू शकता.
तुम्ही अधिकृत संकेतस्थाळावर गेल्यानंतर शेतकरी योजनांमध्ये कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या पर्यायावर जायचं आहे,तिथे गेल्यावर व्यवस्थित माहिती भरून नोंदणी करायची आहे आणि नंतर अर्ज सादर करायचा आहे.
तुम्ही सुद्धा या योजनेतून लाभ घेण्यास इच्छुक असाल तर या योजनेचे मिळणारे लाभ तसेच शासन निर्णय आणि ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा तुम्हाला वर दिलेली आहे,त्यावर जाऊन अर्ज सादर करावा जर तुम्हाला अर्ज भरता येत नसेल तर जवळच्या महा-ई सेवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज सादर करू शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न? (FAQ’s)
1.या योजनेसाठी मी किती वेळा अर्ज करू शकतो
Ans : या योजनेसाठी दरवर्षी तुम्ही वेगवेगळ्या अवजारासाठी अर्ज करू शकता.
2.एकाच अवजारासाठी मी दुसऱ्या वर्षी अर्ज करू शकतो का?
Ans: नाही, एकच अवजारासाठी तुम्ही पुढील दहा वर्षा अर्ज करू शकणार नाही इतर अवजारासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
3.हे अर्ज ऑनलाईन भरता येईल का?
Ans : हे अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज ची सुविधा महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याची लिंक वर दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता.