Birsa Munda Krushi Kranti Yojana 2025 : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमार्फत विहीर,बोअरवेल,तुषार व ठिबक सिंचनासाठी अडीच लाखापर्यंत अर्थसहाय्य्य

Birsa Munda Krushi Kranti Yojana 2025 : जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाचे शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कृषी विभागामार्फत राबवलेली आहे.

या योजनेअंतर्गत नवीन विहीरीसाठी अडीच लाख जुन्या विहीरीसाठी दुरुस्ती साठी 50 हजार, इनवेल बोरिंग साठी 20 हजार, पंप संच साठी 20 हजर, वीज जोडणी आकार साठी 10 हजार, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण साठी 01 लाख रुपये, सूक्ष्म सिंचन संच ठिबक सिंचन 50 हजार व तुषार सिंचन 25 हजार,पीव्हीसी पाईप 30 हजार, परसबाग 500 रुपये या बाबीवर अनुदान देण्यात येत आहे.

सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली व कोल्हापूर ही जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे वर दिलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यां व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील शेतकरी अर्ज करू शकतील.

काय पात्रता असेल?

  • यासाठी लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असने बंधनकारक आहे
  • लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • जमिनीचा सातबारा व गाव नमुना आठचा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादित असावे यासाठी उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थ्याची जमीन 0.2 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत असावी, नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर जमीन असणे बंधनकारक आहे.
  • एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्षासाठी त्याच लाभार्थ्यांना किंवा कुटुंबातील कोणालाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आवश्यक कागदपत्रे

नवीन विहिरीसाठी

  1. जातीचे वैध दाखला
  2. सातबारा व आठ अ चा उतारा
  3. उत्पन्नाचा दाखला
  4. लाभार्थ्याचे प्रतिज्ञापत्र 100 किंवा 500 च्या स्टॅम्प पेपरवर.
  5. अपंगत्व असल्यास तसे प्रमाणपत्र
  6. तलाठी यांच्याकडील दाखला सामायिक एकूण धरण क्षेत्र बाबतचा दाखला.
  7. विहीर नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
  8. प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरी पासून पाचशे फुटा पेक्षा जास्त अंतरावर असलेला दाखला.
  9. प्रस्तावित विहीर सर्वे नंबर नकाशा
  10. शेतीच्या सीमा याबाबतचे कागदपत्र लागतील.
  11. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणाकडे पाणी उपलब्धतेचा दाखला
  12. कृषी अधिकारी यांचे क्षेत्र पाणी व शिफारस पत्र
  13. गटविकास अधिकारी यांच्या शिफारस पत्र
  14. ज्या जागेवर विहीर घ्यायचे आहे त्या जागेचा फोटो महत्त्वाच्या खुणेसह आणि लाभार्थ्यासह तो फोटो असावा.
  15. माननीय प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे आदिवासी उपाय योजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्यक व घटनेच्या कलम 275 अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणार आहे या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
  16. ग्रामसभेचा ठराव

जुने विहिरीसाठी किंवा इनवेल बोअर यासाठी कागदपत्र

  1. सक्षम प्राधिकारी यांच्याकडून अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र.
  2. तहसीलदार यांच्याकडे मागील वर्षाच्या वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  3. जमीन धारणाचा अद्यावत सातबाराचा दाखला व आठ अ चा उतारा
  4. ग्रामसभेचा ठराव
  5. तलाठी यांच्याकडे लाभार्थीचे बंदपत्र
  6. कृषी अधिकारी यांच्या क्षेत्र पाहणी व शिफारस पत्र
  7. गटविकास अधिकारी यांचे शिफारस पत्र
  8. ज्यावेळी वर जुनी विहीर दुरुस्ती अथवा इनवेल बोअरिंग चे काम करायचे आहे त्यावेळीच्या काम सुरू होण्यापूर्वीचा फोटो
  9. इनवेल बोरिंग साठी भूजल संरक्षण विकास यंत्रणे कडे फिजिबिलिटी रिपोर्ट
  10. अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र
  11. माननीय प्रकल्पाधिकारी आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे आदिवासी विकास योजना व केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य व घटनेच्या कलम 275 अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.

शेततळ्यात अस्तरीकरण/वीज जोडणी आकार/सूक्ष्म सिंचन संच याकरिता कागदपत्र

  1. सक्षम प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र.
  2. तहसीलदार यांच्याकडे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्न दीड लाखाच्या खाली असावे किंवा दारिद्र रेषेखाली असले बाबतचे प्रमाणपत्र किंवा बीपीएल कार्ड लागू असल्यास ते सादर करावे.
  3. जमीन धारणाचा अद्यावत सातबारा व आठ अ चा उतारा
  4. तलाठी यांच्याकडे एकूण धारणा क्षेत्र बाबतचा दाखला
  5. ग्रामसभेची मंजुरी
  6. शेततळे अस्तरीकरण पूर्णत्वाबाबतच्या हमीपत्र
  7. काम सुरू होण्यापूर्वीचा फोटो
  8. विद्युत कनेक्शन व विद्युत पंप संच असल्याबाबतचे हमीपत्र
  9. शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकित प्रत
  10. मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांच्यातील अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करून घ्याव्यात.

अर्ज कसा करावा

यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता महाराष्ट्र शासनाच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर योजनेविषयी सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता. त्यानंतर अर्जदाराची नोंदणी करून अर्जदाराने लॉगिन करावे व लॉगिन करून संबंधित योजनेची निवड करावी आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

इतर आवश्यक माहिती शासन निर्णय मध्ये दिलेली आहे हा शासन निर्णयाची PDF तुम्ही येथे क्लिक करून डाउनलोड करून वाचू शकता आणि त्यानुसार अर्ज सादर करू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो का?

Ans : हो, वर नमूद केल्याप्रमाणे अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकता.

2.मला 2020-21 मध्ये विहीर मिळालेली आहे मी 23-24 मध्ये दुसऱ्या विहिरीसाठी अर्ज करू शकतो का?

Ans: नाही, विहिरीसाठी तुम्ही पाच वर्षातून एकदाच अर्ज करू शकता तुमच्या कुटुंबाला सुद्धा या विहिरीसाठी अर्ज करता येणार नाही.

3.हे अनुदान किती रुपयापर्यंत मिळते?

Ans: नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये व इनवेल बोरिंग साठी वीस हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते.

Leave a Comment