Krishi Swawlamban Yojana 2025 : कृषी स्वावलंबन योजनेमधून शेतकऱ्यांना विहीर व बोअरवेल साठी अनुदान;वाचा सविस्तर माहिती

Krishi Swawlamban Yojana 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याचा दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत चालवली जाते.

या योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी, इनवेल बोरिंग साठी, विज आकार जोडणीसाठी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण साठी, सूक्ष्म सिंचन संच म्हणजे ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन साठी 25000 रुपये एवढे अनुदान दिले जाते.

पीव्हीसी पाईप साठी, परसबागेसाठी सुद्धा या योजनेमार्फत अनुदान दिले जाते वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या अनुदान या पीडीएफ मध्ये दिलेले आहे त्यानुसार तुम्ही या योजनेमध्ये अनुदान किती मिळते ते पाहू शकता.

सदरची योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे वगळून राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे.

किती अनुदान मिळते?

या योजनेअंतर्गत खालील प्रमाणे अनुदान दिले जाते.

  1. नवीन विहीर – 2.5 लाख रुपये
  2. जुनी विहीर दुरुस्ती – 50 हजार रुपये
  3. इनवेल बोरिंग – 20000 रुपये
  4. पंप संच खरेदी – 20000 रुपये
  5. विज आकार जोडणी – 10000 रुपये
  6. शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण – 01 लाख रुपये
  7. सूक्ष्म सिंचन संच ठिबक सिंचन संच – 50000 रुपये
  8. तुषार सिंचन संच – 25000 रुपये
  9. पीव्हीसी पाईप – 30000 रुपये
  10. परसबाग – 500 रुपये

आवश्यक पात्रता (Krishi Swawlamban Yojana 2025)

  • लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा.
  • लाभार्थ्यांकडे जातीचा वैध दाखला असावा.
  • जमिनीचा सातबारा, आठ अ चा उतारा असावा.
  • लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न दीड लाखाच्या आत असावे (वार्षिक उत्पन्नासाठी उत्पन्नाचा दाखला सादर करावा)
  • लाभार्थ्याची जमीन 0.20 हेक्तर ते 6 हेक्टर पर्यंत असावी.
  • नवीन विहिरीसाठी कमीत कमी 0.40 हेक्टर जमीन असणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे

नवीन विहीर अनुदानाकरिता

  1. अधिकृत अधिकाऱ्याने दिलेला अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
  2. जमिनीचा सातबारा व आठ अ चा उतारा
  3. तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र (उत्पन्न दीड लाखाच्या आत असावे)
  4. लाभार्थ्याची प्रतिज्ञापत्र शंभर रुपये किंवा पाचशे रुपये स्टॅम्प पेपरवर
  5. अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला
  6. तलाठी यांच्याकडील अगोदर कोणती विहीर नसल्याबाबतचा दाखला
  7. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा कडे पाणी असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  8. कृषी अधिकारी यांचा क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र
  9. गटविकास अधिकारी यांच्या शिफारस पत्र ज्या जागेवर विहीर घ्यायचे आहे त्या जागेचा फोटो यामध्ये जागेची खूण व जागेचा मालकाचा फोटो असावा.
  10. ग्राम सभेने मंजूर केलेल्या ठराव.

जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी किंवा इनवेल बोरिंग घेण्यासाठी कागदपत्र

  1. सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनुसूचित जातीची जात प्रमाणपत्र
  2. तहसीलदार यांच्याकडचा वार्षिक उत्पन्नाचा पुरावा
  3. अद्यावत सातबाराचा दाखला
  4. गाव नमुना ८-अ
  5. ग्रामसभेने मंजूर केलेला ठराव
  6. तलाठी यांच्याकडे विहीर नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
  7. लाभार्थ्याचे बंद पत्र शंभर किंवा पाचशेच्या स्टॅम्प पेपर
  8. कृषी अधिकारी यांचे पाहणी व शिफारस पत्र
  9. गटविकास अधिकारी यांचे शिफारस पत्र
  10. ज्या विहिरीवर जुनी विहीर दुरुस्ती/इनवेल बोरिंग चे काम घ्यायचे त्यावेळी चा काम सुरु होण्यापूर्वीचा फोटो (या फोटोमध्ये लाभार्थी व महत्त्वाची खुण असावी)
  11. इनवेल बोरिंग साठी भूजल संरक्षण यंत्रणा कडे पाणी असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  12. अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला

शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण/वीज जोडणी आकार पंपसंच करिता आवश्यक कागदपत्र

  1. अधिकृत अधिकाऱ्याने दिलेला अनुसूचित जातींची जात प्रमाणपत्र
  2. तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र (उत्पन्न दीड लाखाच्या आत असावे)
  3. जमीन असल्याबाबतचा पुरावा म्हणून सातबाराचा दाखला आठ-अ
  4. तलाठी यांच्याकडे एकूण धारण क्षेत्र बाबतचा दाखला
  5. ग्रामसभेचे शिफारस किंवा मंजुरी
  6. शेततळे अस्तरीकरण पूर्णत्वाबाबतचे हमीपत्र 100 किंवा पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर
  7. काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो
  8. विद्युत कनेक्शन व वीज पंपसंच नसलेबाबतचे हमीपत्र
  9. प्रत्यक्ष शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकित प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडून अंदाजपत्रक (याची प्रत स्वाक्षरी करून घ्यावी).

याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही शासन निर्णयामध्ये पाहू शकता याचा शासन निर्णय याची लिंक https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/PDF/Scheme-DrBabasahebAmbedkarKrushiSwavalambanYojana.pdf येथे दिलेले आहे या लिंक वरून तुम्ही शासन निर्णय डाऊनलोड करू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न? FAQ’s

1.या योजनेत मी अर्ज कसा करू शकतो?

Ans: या योजनेमध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला जायचे आहे.

2.माझ्याकडे कॅम्पुटर नाही मी कसा अर्ज करू?

Ans: तुम्ही मोबाईलवरून सुद्धा सादर करू शकता वर लिंक दिलेली आहे त्या लिंक वरून तुम्ही ही लिंक ओपन करून अर्ज करू शकता.

3.अर्जदाराची नोंदणी करण्यासाठी आधार आवश्यक आहे का?

Ans: हो, आधार चा नंबर टाकूनच तुम्हाला नोंदणी करावी लागते.

4.मी 2024-25 मध्ये विहीर घेतलेले आहे परत या योजनेचा लाभ घेऊ शकतो?

Ans: पाच वर्षापर्यंत तुम्ही सदर योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही त्यानंतर या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment