Government Education Schemes : गरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आवश्यक ते कौशल्य मिळवण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने विविध योजना केलेल्या आहेत.
26 मे 2014 पासून केंद्र सरकार मध्ये असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक दृष्ट वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षण मिळवण्यासाठी व या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्य सुधारण्याचे संधी मिळावी यासाठी विविध शिष्यवृत्ती आणि कार्यक्रम तयार केलेले आहेत यापैकी काही महत्त्वाचे कार्यक्रम योजना खाली दिलेल्या आहेत त्याची सविस्तर माहिती पाहू शकतात
Table of Contents
पीएम शिष्यवृत्ती योजना किंवा पी एम एस एस सी
अभ्यासक्रमावर अवलंबून असलेले एक ते पाच वर्षाच्या कालावधीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिले जातात. विद्यार्थ्यांसाठी दरमहा अडीच हजार आणि मुलीसाठी दरमहा तीन हजार एवढी रक्कम या शिष्यवृत्ती मार्फत दिली जाते किंवा इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीमद्वारे हे रक्कम विद्यार्थ्यांचे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते.
या योजनेचा उद्देश एवढाच आहे की गरीब कुटुंबावर आर्थिक भार जास्त पडू नये आणि हा भार कमी व्हावा तसेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे.मान्यताप्राप्त विविध तांत्रिक संस्थांमध्ये नोंदणीकृत विद्यार्थ्यांना या योजनेद्वारे शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.
यामध्ये वैद्यकीय, दंत, पशुवैद्यकीय, अभियांत्रिकी, MBA आणि MCA अभ्यासक्रमासारख्या क्षेत्राचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी 5900 मुलांना मुलींना निवड केल्या जाते.
आवश्यक पात्रता
- 60% मार्क सह त्यांचे दहावी व बारावी आवश्यक आहे.
- डिप्लोमा किंवा पदवीधर असणे गरजेचे आहे.
कौशल विकास योजना
प्रधानमंत्री कौशल विकास योजना हा कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयात मार्फत चालवला जाणारा एक प्रमुख उपक्रम आहे यात तरुणांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी कौशल्य विकसित करणे हे या योजनेचा उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ या योजनेच्या आयोजन करतात याला प्रधानमंत्री युवक प्रशिक्षण कार्यक्रम म्हणून ओळखले जात आहे या योजनेमध्ये वेगवेगळ्या तीन प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये शॉर्ट टर्म ट्रेनिंग, नवीन कौशल्य प्राप्त करण्याची किंवा विद्यमान कौशल्य वाढवण्याची इच्छा असेल त्यासाठी उपक्रम आहे.
पूर्व कौशल्य असलेल्या व्यक्तींसाठी विशेष प्रकल्प सामान्य आणि असुरक्षित गटासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेमार्फत दिला जातो. 45 वर्षे वयोगटातील लोक अल्पकालीन प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.
हा कार्यक्रम औपचारिक शिक्षण शाळा किंवा महाविद्यालय सोडलेल्या बेरोजगार भारतीय नागरिकांसाठी खुल्या आहेत ज्याच्याकडे यापूर्वीच्या कामाचा अनुभव आहे, कौशल्य आहे ते 18 ते 69 वयोगटातील व्यक्ती त्यांच्या क्षमताप्रमाणेच करण्यासाठी पूर्वीचे शिक्षणाच्या मान्यतेसाठी अप्लाय करू शकतात.
पीएम केअर फॉर्च्यून स्कीम
कोरोनाच्या च्या महामारी दरम्यान कायदेशीर पालक या दत्तक पालक दोन्ही गमावलेला मुलांना मदत करण्यासाठी पीएम केअर फॉर्च्यून स्कीम सुरू करण्यात आली ही योजना 29 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे मुलांचे वय वर्ष 23 असेपर्यंत या मुलांची काळजी येथे घेतली जाते.
ही स्कीम प्रति मुलासाठी दहा लाख पर्यंतच्या आर्थिक शक्तत प्रदान करते हे मुलांसाठी त्याची एकूण स्वास्थ्य सुनिश्चित करण्यासाठी बोर्डिंग, लॉजिंग इत्यादी सुविधा सुद्धा या योजना अंतर्गत दिला जातात प्रतिवर्षी वीस हजार रुपये देणाऱ्या मुलांसाठी ही शिष्यवृत्ती प्रदान करून मुलांसाठी भविष्यातील शिक्षणात सहाय्य करते, ही स्कीम प्रति मुलाला पाच लाखाचा हेल्थ इन्शुरन्स देखील प्राप्त करते.
अटल इनोव्हेशन मिशन
अटल इनोव्हेशन मिशन या भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत नवकल्पना आणि उद्योजकतेची संस्कृती प्रोत्साहित करणे व्यवसायिकांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम/धोरणे तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतातील टियर 2, टियर 3 शहरे, महत्वाकांक्षी जिल्हे, आदिवासी, डोंगराळ आणि किनारी भागांसह तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील नवोपक्रमाच्या फायद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, AIM अद्वितीय भागीदारी आधारित मॉडेलसह अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर्सची स्थापना करत आहे . एआयएम ACIC च्या त्या भागीदाराला 2.5 कोटी रुपयांपर्यंत अनुदान देईल ,जो भागीदार समान किंवा जास्त जुळणारा निधी सिद्ध करेल
पीएम इ- विद्या
हा विद्यार्थ्यांना गुणवंत पूर्ण डिजिटल शिक्षण प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेल्या प्रोग्राम आहे हे दीक्षा पोर्टल आणि मोबाईल ॲप द्वारे बुक आणि शैक्षणिक संसाधनाच्या मोठ्या संग्रहाचा एक्सेस विद्यार्थ्यांना देते.
पीएम विविधतेचे ध्येय डिजिटल आणि ऑनलाईन शिक्षण संस्था वाल्याना सहज ऍक्सेस देऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती आणणे हा आहे. या कार्यक्रमांतर्गत सरकारने 1 ते 12 पर्यंतच्या प्रत्येक वर्गासाठी टीव्ही चॅनल देखील सुरू केले आहेत.
एक व्यवसायिक चॅनेल उपक्रम म्हणून ओळखले जाते हे चॅनेल स्पर्धेत श्रेणीच्या स्तरावर तयार केलेल्या शैक्षणिक कंटेंट या चॅनलवर दाखवले जातात ते कंटेंट यांनी सीइआरटी, सीबीएसइ, आयसीएसई आणि इतर संस्थाद्वारे विकसित केले जाते.
विविध प्रादेशिक भाषेमध्ये उपलब्ध आहे यामुळे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी पीएम विद्यालयांना त्यांचे लोकेशन किंवा भाषा प्राधान्य विचारात न घेता मौल्यवर नमूद केलेल्या योजना व्यतिरिक्त भरपूर योजना भारत सरकार तर्फे व महाराष्ट्र शासनातर्फ राबवल्या जातात.