Kotak Suraksha Scholarship : कोटक सुरक्षा स्कॉलरशिप प्रोग्राम मध्ये अपंग विद्यार्थ्यांना तब्ब्ल 01 लाख रुपये शिष्यवृत्ती;वाचा सविस्तर

Kotak Suraksha Scholarship : कोटक महिंद्रा बँक आणि त्यांच्या इतर संस्थेकडून दरवर्षी विविध प्रकारच्या योजना त्यांच्या CSR प्रोग्रॅम अंतर्गत राबविल्या जातात, यातून गरीब सर्वसामान्यांना अर्थी लाभ मिळत असतो. सर्व अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्याने बाहेर कुठेतरी जाऊन अर्ज भरण्याची गरज पडत नाही.

कोटक सेक्युरिटीज अंतर्गत कोटक सुरक्षा स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 राबवत आहे हे शिष्यवृत्ती अपंग विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे, भारतातील कोणत्याही राज्यातील अपंग विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतील त्यांना शिक्षणासाठी जो खर्च लागणार आहे ते खर्च कोटक सेक्युरिटी मार्फत दिल्या जाणार आहे.

तब्बल एक लाख रुपये पर्यंतची ही शिष्यवृत्ती अपंग विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे, या शिष्यवृत्तीसाठी 30 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करायचे आहेत, यामध्ये भारतातील कोणतेही अपंग उमेदवार अर्ज करू शकणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी तुम्ही पात्र असाल आणि तुम्हाला अर्ज करून या योजनेचा अर्थी लाभ घ्यायचा असेल तर खाली सर्व माहिती वाचून ऑनलाईन अर्ज करावा.

आवश्यक पात्रता

  1. अर्ज करणारा अर्जदार हा अपंग असावा.
  2. अर्जदार कोणत्याही शाखेमध्ये पदवी अभ्यासक्रमाला शिक्षण घेत असावा.
  3. अर्जदाराला मागील वर्षी कमीत कमी 50 टक्के गुण मिळालेले असावे.
  4. अर्जदाराच्या सर्व कुटुंबाचे एकूण उत्पन्न तीन लाख वीस हजार पर्यंत असावे त्यापेक्षा जास्त असल्यास ही शिष्यवृत्ती मिळणार नाही.
  5. सर्व अपंग उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
  6. कोटक सेक्युरिटी आणि बडी फोर स्टडी च्या कर्मचाऱ्यांचे पाल्य या शिष्यवृत्तीसाठी पात्र राहणार नाहीत.

फायदे काय मिळतील?

62 हजार ते 01 लाख रुपया पर्यंत अर्जदारांना स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.

स्कॉलरशिप चा वापर

हे स्कॉलरशिप तुम्हाला मिळाल्यानंतर या स्कॉलरशिप मध्ये तुम्ही ट्युशन फीज, हॉस्टेल फीज, मेस, ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, बुक, स्टेशनरी, डिव्हाइसेस, डेटा व उपकरणे जी अपंगत्वासाठी लागणारे उपकरणे असतील त्या उपकरणासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता.

आवश्यक कागदपत्र (Kotak Suraksha Scholarship)

  1. ओळखीचा पुरावा (ज्यामध्ये आधार कार्ड)
    प्रवेश घेतल्याचा पुरावा (त्यामध्ये प्रवेश पत्र, आयडेंटिटी कार्ड)
  2. बोनाफाईड सर्टिफिकेट
  3. फेस स्ट्रक्चर किंवा फी भरल्याची पावती.
  4. दहावी बारावीचे गुणपत्रक
  5. मागील वर्षाचे गुणपत्रक
  6. उत्पन्नाचा पुरावा (यामध्ये तुम्ही ग्रामपंचायत ने दिलेला उत्पन्नाचा दाखला देऊ शकता, तहसीलदार किंवा इतर शासकीय अधिकाऱ्याने दिलेला दाखला देऊ शकता. जरी दाखला नसल्यास तुम्हाला विषयाची ऍफिडेव्हिट द्यावी लागेल)
  7. सिंगल मदर किंवा विधवा असल्यास तसे डिकलरेशन देणे आवश्यक आहे.
  8. मागील तीन महिन्याचे पगार पत्रक किंवा आयटी रिटर्न किंवा फॉर्म 16 किंवा रेशन कार्ड अथवा बीपीएलचे कार्ड.
  9. बँक अकाउंट डिटेल्स (चेक बुक किंवा बँक पासबुक)
  10. अर्जदाराचा सध्याच्या काळातला फोटोग्राफ
    अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  11. पालकांचे मृत्युपत्र जर एकलपालक असल्यास.

अर्ज कसा कराल

  • या शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे अर्ज करण्यासाठी https://www.buddy4study.com/page/kotak-suraksha-scholarship-program या लिंक वर तुम्हाला जायचे आहे.
  • या लिंक वर गेल्यावर तुम्ही अप्लाय नाऊ या बटलाला क्लिक करायचं आहे अप्लाय नाऊ या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला बडी फोर स्टडी चा रजिस्टर आयडी टाकावा लागेल जर तुम्ही अगोदर नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला कोटक सुरक्षा स्कॉलरशिप प्रोग्राम 24-25 चा एप्लीकेशन फॉर्म वर पाठवण्यात येईल तिथे तुम्ही अर्ज भरण्यास सुरुवात करू शकता.
    सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित रित्या भरायची आहे आवश्यक ते सर्व कागदपत्रे तुम्हाला त्यात उपलोड करायचे आहेत.
  • त्यानंतर ज्या टर्म्स कंडीशन दिलेल्या आहेत त्या टर्म कंडिशन एक्सेप्ट करून प्रीविव् या बटनाला क्लिक करायचं आहे.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरलेली आहे का नाही हे पाहून तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

1.या शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया कशी असेल?

Ans : प्राप्त झालेल्या अर्जानुसार अर्जाची पडताळणी केली जाईल त्यानंतर फोन द्वारे मुलाखत घेतल्या जाईल आणि कागदपत्राची पडताळणी करून अर्जदाराची निवड केल्या जाईल.

2.मी स्कॉलरशिप मध्ये निवडले तर मला पैसे कसे मिळतील?

Ans: हे पैसे तुमच्या अकाउंटला दरवर्षी ट्रान्सफर केले जातील

3.ही स्कॉलरशिप दरवर्षी रिन्यू होईल का?

Ans: हो, ही स्कॉलरशिप दरवर्षी रिन्यू केल्या जाईल यासाठी तुम्हाला आवश्यक ती सर्व कागदपत्रे मागच्या वर्षीचे अकॅडमी रेकॉर्ड ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागतील.

4.एखाद्याच्या पालकाला शाळेची फी भरता आली नाही तर या शिष्यवृत्तीतून ऍडव्हान्स रक्कम पालक घेऊ शकतील का?

Ans: हो, हे सर्व निर्णय संबंधित शिष्यवृत्ती देणाऱ्या संस्थेकडे राखून ठेवलेले आहेत त्याविषयीची माहिती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून सुद्धा घेऊ शकता.

Leave a Comment