Fine for Loan Closure : हल्लीच्या काळात प्रत्येक व्यक्ती कर्जामध्ये डुबलेला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर कसले ना कसले हफ्ते आपल्याला पाहायला मिळतात. घर, वाहन, कपडे, चैनीच्या वस्तू देखील आपण कर्जावरच घेतो. वेगवेगळ्या प्रकारचे हप्ते दर महिन्याला फेडावे लागत असतात. कधी शिक्षणासाठी कर्ज घ्यावे लागते, कधी घरातील वस्तू विकत घेण्यासाठी कर्जातच मनुष्याचे अर्धे जीवन व्यतित होत आहे.
कॅलेंडरच्या तारखेवरच सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तारखेला एकतरी ईएमआय भरावा लागतो. जर ईएमआय वेळेवर भरला नाही तर बँक आपल्याला दंड लावत असते. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जे वेळेवर कर्ज देखील भरत असतात परंतु असे वेळेवर पैसे भरून देखील बँक त्यांना दंड लावत असते.
जर तुमच्या बाबतीत देखील असे काही घडत असेल तर हि माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. आजच्या या लेखांमधून आम्ही तुम्हाला दंड लागू नये याकरिता नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल सांगणार आहोत.
कर्ज लवकर फेडण्याची घाई करू नका
आज प्रत्येकाकडे बचत केलेला पैसा असतोच असे नाही अशावेळी घर, वाहन, मुलांचे शिक्षण व स्वतःचे शिक्षण घरातील अनेक गोष्टी, आरोग्य या सर्वांचे व्यवस्थित रित्या काळजी घेण्यासाठी आपल्याला कर्ज घेणे भाग पडते यामुळे अनेक वर्ष आपण कर्ज (Fine for Loan Closure) भरत राहतो ज्या लोकांना पगार जास्त असतो अशा लोकांना देखील पगाराचा मोठा हिस्सा कर्जासाठी भरावा लागतो.
आपल्यापैकी अनेकजण कर्ज लवकरच चुकते करता यावे याकरिता अनेक प्लॅनिंग करत असतात. प्रत्येक जण वेळेवर देखील कर्ज भरत असतात यामुळे EMI चा जो दंड असते त्यातून आपल्याला सवलत मिळते परंतु अनेकदा कर्जाची परतफेड वेळेवर करत असताना देखील दंड आपल्याला भरावा लागतो अनेकवेळा एखाद्या व्याजाच्या बरोबरीने देखील आपल्याला रक्कम पुन्हा भरावी लागते.
प्री पेमेंट पेनल्टी म्हणजे काय? (Fine for Loan Closure)
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर कर्ज घेत असतो तेव्हा ते कर्ज किती कालावधीसाठी दिले जाणार आहे तसेच त्या कर्जावर किती EMI भरावा लागणार आहे हे निश्चित केलेले असते. त्यानुसार बँक आपल्याला कर्ज देते व त्यावरील हप्ता देखील ठरवलेला असतो, आपण घेतलेल्या रकमेवर बँक विशिष्ट स्वरूपामध्ये व्याज लावत असते.
जेव्हा आपण एखाद्या कर्जाची लवकर परतफेड करतो, तेव्हा बँक देणाऱ्या किंवा कर्ज देणाऱ्या व्यक्तीकडून त्यांना अपेक्षेप्रमाणे व्याज मिळत नाही. ते व्याज कव्हर करण्यासाठी अनेक बँक आपल्यावर प्री-पेमेंट पेनल्टी आकारते जेणेकरून त्यांना कर्जामुळे चांगला परतावा मिळू शकतो.
नियम आधी वाचा
जेव्हा आपण एखाद्या बँकेकडून कर्ज घेतो तेव्हा त्यांच्या नियमावली मध्ये काही नियम दिलेले असतात व काही अटी देखील सांगितलेल्या असतात त्याच नियमावलीमध्ये आपल्याला दंड देखील सांगितलेला असतो.
जर आपण वेळेच्या आधी कर्ज फेडले तर आपल्याला विशिष्ट टक्केवारीच्या आधारावर दंड (Fine for Loan Closure) आकारले जातात व तुम्हाला दंड भरावा लागतो, म्हणूनच पुढच्या वेळी जर तुम्ही एखादी कर्ज घेणार असाल तर अशावेळी सर्व अटी व शर्ती वाचा आणि त्यानंतरच कर्जासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांवर स्वाक्षरी करा.
कर्जाच्या अटींमध्ये या दंडाचा उल्लेख आहे कि नाही ते पहा, काही सावकार ठराविक दंड आकारतात तर काही टक्केवारीच्या आधारावर दंड आकारतात. म्हणून, कर्जाच्या दस्तऐवजावर सही करण्यापूर्वी, त्याच्या अटी व नियम वाचल्याची खात्री करा. या कर्जाची परतफेड करताना काय होईल किंवा थोडा विलंब झाल्यास किती दंड आकारला जाईल याची माहिती घ्या.
प्री पेमेंट पेनल्टी कसा काढला जातो ?
आपण जेव्हा कर्ज घेतो तेव्हा त्या कर्जाच्या नियमावली मध्ये प्री पेमेंट पेनल्टी चा उल्लेख देखील अनेकदा केलेला नसतो, अशावेळी तुम्हाला कर्ज लवकर जर फेडले तर कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नसते परंतु जर कर्ज अटींमध्ये दंडाचा उल्लेख केलेला असेल तर तुम्हाला ठराविक वर्ष तरी तुमचे कर्ज भरावे लागते.
जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो प्री-पेमेंट (Fine for Loan Closure) पेनल्टी असल्यास कर्जाची आगाउ रक्कम तुम्ही लवकर फेडला तर दंड लागतो. जर आपण व्याजाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास व्याजाबद्दल तुमची चांगली बचत तर होईल.
परंतु कर्ज लवकर फेडण्याचे नादामध्ये तुम्हाला अतिरिक्त पेमेंट देखील भरावे लागू शकते आणि म्हणूनच ठराविक वर्ष कर्ज न फेडता तुम्ही विशिष्ट वर्षानंतर तुमचे कर्ज फेडून बंद करू शकता.
1 thought on “घेतलेले कर्ज लवकर फेडायचा विचार करताय !! हे वाचा आणि परत ठरवा | Fine for Loan Closure”